शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पथदिवे सुरू करण्याची नागरिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

दुर्गम भागातील बँकांमध्ये गर्दी धडगाव : तालुक्यातील बँकांमध्ये नेहमीप्रमाणे आदिवासी बांधव गर्दी करत आहेत. विविध शासकीय योजनांच्या लाभासह घरकुलांचे ...

दुर्गम भागातील बँकांमध्ये गर्दी

धडगाव : तालुक्यातील बँकांमध्ये नेहमीप्रमाणे आदिवासी बांधव गर्दी करत आहेत. विविध शासकीय योजनांच्या लाभासह घरकुलांचे हप्ते काढण्यासाठी ही गर्दी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे सकाळी सातपासून रांगा लावल्या जात आहेत.

हवामान अंदाजानुसार शेतीकामांचे नियोजन

नंदुरबार : तालुक्यातील कोळदे येथील कृषी विज्ञान केंद्राच्या जिल्हा कृषी हवामान केंद्राकडून हवामान अंदाजानुसार शेतीकामांचे नियोजन सध्या करण्यात येत आहे. या केंद्राकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सल्ल्यांचे पालन शेतकरी करत आहेत. जिल्ह्यात येत्या ७ जुलैपर्यंत पाऊस येण्याची शक्यता केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पेरण्या न करण्याचा सल्ला या केंद्राकडून देण्यात आला आहे.

घरकुलांचे हप्ते मिळत नसल्याच्या तक्रारी

नंदुरबार : तालुक्यातील विविध भागात लाभार्थींना आवास योजनांमध्ये समाविष्ट करूनही हप्ते मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देत नव्याने समावेश करण्यात आलेल्या लाभार्थींना पहिला देण्याची मागणी आहे.

उपाययोजनांअभावी नागरिक हैराण

नंदुरबार : तळोदा ते नंदुरबार दरम्यान राकसवाडा चाैफुलीवर उपाययोजना करण्याबाबत उदासीनता आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी असून साईडपट्ट्या चांगल्या दर्जाच्या कराव्यात, अशी अपेक्षा आहे. याठिकाणी अपघात होत आहेत.

दुर्गम भागातील दरडींचे व्यवस्थापन शून्यच

नंदुरबार : अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात सातपुड्याच्या दुर्गम भागात कोसळणाऱ्या दरडींचे व्यवस्थापन यंदा शून्यच असल्याचे दिसून येत आहे. सातपुड्यात पावसाळ्यात दरडी कोसळून रस्ते वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यातून प्रमुख घाटरस्त्यांवर काही उपाययोजना गेल्या काही वर्षात केल्या गेल्या आहेत. परंतु यानंतरही दरड कोसळून रस्ते वाहतूक बंद होण्याचे प्रकार गेल्या वर्षात घडले होते. यंदाही दरडी कोसळत आहेत.

जिल्हा रुग्णालयात नेत्र तपासणी सुरू करा

नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात नियमित नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. याकडे लक्ष देत प्रशासनाने नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. शस्त्रक्रियांच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत.

ग्रामीण रुग्णालयात तपासणीला गती द्या

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालयांमध्ये सकाळी ९ वाजेपासून रुग्ण तपासणी सुरू करण्याची अपेक्षा आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. रुग्णालयांमध्ये सकाळी १० नंतर रुग्ण तपासणी सुरू होत असल्याची माहिती आहे.

दुर्गम भागात सर्पदंश लसींचा पुरवठा व्हावा

धडगाव : तालुक्याच्या दुर्गम व अती दुर्गम भागात पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना घडतात. यातून काहींना जीवही गमावावा लागतो. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये सर्पदंशावरील लसींचा पुरवठा वेळेवर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

कोल्ड स्टोरेजसमुळे रोजगार वाढला

नंदुरबार : शहरातील विविध भागात असलेल्या कोल्ड स्टोरेजेसमधील कामांना गती आली आहे. यातून बेरोजगार मजुरांना कामे मिळू लागली आहेत. पावसाळ्यामुळे विविध अन्नधान्यासह इतर मालाचा साठा वाढला असल्याने मजुरांना कामे मिळत आहेत.