शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनचे नागरिकांना भान, दस्त नोंदणी कार्यालयही सुनसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST

नंदुरबार : जिल्ह्यात लाॅकडाऊनचे काटेकाेरपणे पालन करण्यात येत आहे. यातून जिल्ह्यातील जमीन खरेदी व विक्रीसह त्यासंबंधातील इतर आर्थिक व्यवहारही ...

नंदुरबार : जिल्ह्यात लाॅकडाऊनचे काटेकाेरपणे पालन करण्यात येत आहे. यातून जिल्ह्यातील जमीन खरेदी व विक्रीसह त्यासंबंधातील इतर आर्थिक व्यवहारही पूर्णपणे रद्द करण्यात आले असून यामुळे मुद्रांक व दस्त नोंदणी कार्यालयही सुने पडले असल्याचे दिसून आले आहे. याठिकाणी सद्यस्थितीत केवळ एक किंवा दोन व्यवहार होत आहेत.

नंदुरबार येथील जुने तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या मुद्रांक नोंदणी व दुय्यम निबंधक कार्यालयात एरवी गर्दी मावत नसल्याचे वेळोवेळी दिसून येत होते. दिवसाला जमिनी व घरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांसह गहाणखतांचे किमान ३० ते ३२ व्यवहार या कार्यालयात दैनंदिन होत होते. यातून साधारण ४० कोटी रुपयांची उलाढाल होत होती. या उलाढालीमुळे जिल्ह्याला महसूल मिळत होता. आर्थिक व्यवहारांनुसार जिल्ह्याला महिन्याकाठी साधारण ३० कोटी रुपयांचा महसूल मिळत असल्याचे स्पष्ट करण्यात आला आहे. महिन्याकाठी ३०० किंवा त्यापेक्षा अधिक खरेदी विक्रीचे व्यवहार होऊन त्यातून हा महसूल मिळत होता. तूर्तास मात्र हे व्यवहार बंद असल्याने हा महसूल बुडाला आहे.