बच्चे कंपनी लुटत आहे घोडेस्वारीचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST2021-07-07T04:37:33+5:302021-07-07T04:37:33+5:30

खेचर हे गाढव (नर) व घोडी यांच्या संकरातून निपजतो. त्याची उंची, मान व पुठ्ठा यांचा आकार आणि ...

Children enjoy the company of horseback riding | बच्चे कंपनी लुटत आहे घोडेस्वारीचा आनंद

बच्चे कंपनी लुटत आहे घोडेस्वारीचा आनंद

खेचर हे गाढव (नर) व घोडी यांच्या संकरातून निपजतो. त्याची उंची, मान व पुठ्ठा यांचा आकार आणि शरीरावरील केसांच्या आवरणाचा एकसारखेपणा याबाबतीत खेचराचे घोडीशी साम्य असते. याचा उपयोग डोंगराळ भागात सामानाची ने-आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो. तसेच मेंढपाळ लोकही आपला सामान खेचरावर लादून प्रवास करीत असतात. कळंबू व सारंगखेडा परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात शेतशिवारात खेचरे मोकाट फिरताना दिसत आहे. साधारणत: घोडेस्वारी करताना घोड्याच्या पाठीवर बसण्यासाठी खोगीरचा व घोड्यावर ताबा ठेवून त्याला आपल्या इच्छेप्रमाणे योग्य ती दिशा आणि गती देण्यासाठी लगामचा वापर केला जातो. पण बच्चे कंपनी खेचरावर स्वारी करताना ना खोगीर ना लगाम फक्त खेचराच्या तोंडांत दोर अडकून एखाद्या तरबेज घोडेस्वाराप्रमाणे खेचरावर स्वार होऊन त्याला सुसाट वेगाने पळवून घोडेस्वारीची हौस भागवून घेताना दिसत आहेत.

Web Title: Children enjoy the company of horseback riding