शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

77 गावांमध्ये बालस्नेही उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : राजविहीर, खुषगव्हाण व रोझवा पुनर्वसन या तीन गावांमधील बालस्नेही पंचायती उपक्रमास गेल्यावर्षी प्रचंड प्रतिसाद ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : राजविहीर, खुषगव्हाण व रोझवा पुनर्वसन या तीन गावांमधील बालस्नेही पंचायती उपक्रमास गेल्यावर्षी प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर यंदापासून तळोदा तालुक्यातील 67 व धडगाव तालुक्यातील 10 असे 77 ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. समन्वयकांमार्फत गावात व प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये बालसभा घेऊन विद्याथ्र्याना पंचायतीच्या प्रत्यक्ष कामकाजाची माहिती, नेतृत्वाचे धडे दिले जात आहेत. मुलेही या उपक्रमात उत्साहाने सहभागी होत आहेत.गावाच्या विकासासाठी माहितीबरोबरच ती कामे कशी राबवायची, या कामांमध्ये सक्रीय सहभाग घेऊन मुलांमध्ये नेतृत्व गुण निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने गेल्यावर्षी राज्यात बालस्नेही ग्रामपंचायती हा अत्यंत चांगला उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. या उपक्रमासाठी नंदुरबार जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला होता. त्यातही जिल्ह्यातून तळोदा तालुक्याची निवड करून राजविहीर, खुषगव्हाण व रोझवा पुनर्वसन अशा तीन पंचायतींमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला होता. तिन्ही गावांमधील पंचायतींच्या सदस्य संख्येनुसार मुला-मुलींची सदस्य म्हणून निवड करून पंचायतींमध्येच त्यासाठी स्वतंत्र बालपंचायत स्थापन करण्यात आली होती. तेथूनच हे बालसदस्य आपल्या गावाचा कारभार चालवून विकास कामे, योजनांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत असत. साहजिकच त्यांच्या सक्रीय सहभागामुळे गावातील गटबाजी कमी होऊन कामांमध्येही पारदर्शकता आल्याचे येथील ग्रामपंचायतींचे प्रशासन सांगतात. राजविहीर ग्रामपंचातीच्या एका बालसदस्याने औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या कार्यशाळेत आपण बालस्नेही ग्रामपंचायत वर्षभर कशी हाताळली याचे सुंदर सादरीकरण केले होते. या तिन्ही ग्रामपंचायतींमधील बालस्नेही पंचायतींना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर जिल्ह्यातून तळोदा व धडगाव या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. त्यातही तळोदा तालुक्यातील 67 व धडगाव तालुक्यातील 10 अशा 77 गावांमध्ये यंदापासून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तळोदा तालुक्ययातील बोरद, मोदलपाडा, प्रतापपूर,   मोड, रांझणी, अमोनी, चिनोदा, राणीपूर, धनपूर अशा प्रमुख ग्रामपंचायतींचा समावेश आहे. उपक्रमाची माहिती देण्यासाठी            पाच समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे स्वयंसेवक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये बालसभा घेत आहेत. बालसभांमधून ते प्रत्यक्ष ग्रामपंचायतींची कामे,  सदस्य संख्या, बालहक्क, विकास हक्क, संरक्षक हक्क व  सहभागाचा हक्क याविषयी  मार्गदर्शन करीत आहेत. पहिल्या टप्प्यात बालसभा झाल्यानंतर दुस:या टप्प्यात प्रत्यक्ष पदाधिका:यांची निवड करून कमिटींची स्थापना केली जाणार आहे. आतापावेतो समन्वयकांमार्फत या दोन्ही तालुक्यांमधून 50 बालसभा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

बालस्नेही पंचायतीत तळवे ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तेथील माध्यमिक विद्यालयात बुधवारी बालसभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नीमेश सूर्यवंशी होते. या वेळी प्रभाग समन्वयक पूनम पवार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी बालस्नेही पंचायतीविषयी विद्याथ्र्याना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, बालकांनी आपल्या हक्कांची जाणीव करून घेतली पाहिजे. या बालसभेनंतर प्रत्यक्ष बालपंचायतींची निवड केली जाणणार आहे. त्यातून मुलांचे नेतृत्व गुण पुढे येणार आहेत. अशोक वसावे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन राम सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास वसंत मराठे, एस.एल. महाजन, साहेबराव पाटील, गजेंद्र गोसावी, देवीदास मराठे, आर.बी. पवार, अनिल माळी, अनिल इंदीस, अनिल टवाळे, संजय तनपुरे, गजानन माळी, धनराज केदार, आकाश महाजन उपस्थित होते.