शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

बियर शॉपी फोडणाऱ्या बालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलातील बियर शॉपी फोडून ६४ हजार रुपयांची रोकड लंपास झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलातील बियर शॉपी फोडून ६४ हजार रुपयांची रोकड लंपास झाली होती़ याप्रकरणी एलसीबीच्या पथकाने १५ वर्षीय अल्पवयीन विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेतले आहे़ त्याचे दोन साथीदार पसार झाले असून १९ हजाराचा मुद्देमाल बालकाकडून जप्त करण्यात आला़८ जून रोजी कोरीट नाका परिसरातील व्यापारी संकुलात बियर शॉपी फोडून अज्ञात चोरट्यांनी ६४ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केली होती़ याप्रकरणी हर्षल भगवान जोशी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुरुवारी सायंकाळी एलसीबीचे पथक या भागात गस्त करत असताना गिरीविहार परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या तिघांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली होती़ यानुसार पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी तपास सुरु केला होता़ त्यानुसार गिरीविहार परिसरात संशयितांचा शोध घेतला असता, झोपडपट्टीच्या मागे एका १४ ते १५ वर्षीय बालकाच्या खिशात नोटांचे बंडल असल्याची माहिती पथकाला मिळाली होती़ त्याच्यावर यापूर्वीही घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याने पथकाला त्याची ओळख पटली होती़ त्याला त्याच्या भावासमोर ताब्यात घेतले असता, आकाश आणि विशाल नामक मित्रांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली़ प्रत्येकाने २० हजार रुपये वाटून घेतल्याची माहिती देण्यात आली़ त्याच्या अंगझडतीत १५ हजार रुपये रोख आणि ३ हजार रुपयांचा नवा मोबाईल असा १८ हजार रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला़ दरम्यान त्याच्या साथीदारांचा या भागात शोध घेतला असता, ते पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती देण्यात आली आहे़ अल्पवयीन बालकास उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे़ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस नाईक राकेश मोरे, दादाभाई मासूळ, पोलीस शिपाई अभय राजपूत, आनंदा मराठे, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली आहे़ उर्वरित दोघांना लवकरच ताब्यात घेतले जाईल असे पोलीस दलाकडून सांगण्यात आले आहे़