शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

शिवस्मारकासाठी समितीतर्फे धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:52 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील नियोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा निर्माणाचे काम कांदिवली मुंबई येथील शिल्पकार चंद्रजित ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील नियोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा निर्माणाचे काम कांदिवली मुंबई येथील शिल्पकार चंद्रजित यादव करीत असून त्यांना रविवारी  येथील शिवस्मारक बहुउद्देशीय समितीतर्फे 21 लाख रुपयांचा धनादेश सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, जि.प. सदस्य अभिजीत पाटील व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, सामाजिक कार्यकर्ते  शाम जाधव यांच्या हस्ते देण्यात आला.शहराच्या प्रवेशद्वाराजवळ शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची नागरिकांची होती. या पुतळ्याच्या निर्माणासाठी सर्वपक्षीय सदस्य, विविध सामाजिक संघटनांच्या सदस्यांची सर्वसमावेशक शिवस्मारक बहुउद्देशीय समितीची स्थापना करण्यात आली. यासाठी नगरपालिकेने शहरातील प्रवेशद्वारानजीक सुमारे 21 गुंठे जमीन दिली असून येत्या काही महिन्यात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. याठिकाणी समितीच्या वतीने अश्वारुढ  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा कसा असावा यासाठी समितीच्या सदस्यांनी गेल्या अनेक महिन्यात देशातील विविध ठिकाणी भेट देऊन माहिती   जाणून घेतली. नियोजित रेखाचित्र तयार करण्यात येऊन त्याचे नियोजन करण्यात आले व कांदिवली (मुंबई) येथील महाराष्ट्र शासनाचे कला संचालनालय समितीचे सदस्य चंद्रजित यादव यांना पुतळ्याच्या निर्मितीचे काम सोपविण्यात आले. सुमारे साडेतेरा फूट उंच अश्वारूढ पुतळा असणार असून या पुतळा परिसरात पालिकेच्या वतीने सुशोभीकरण करण्यात येणार आहे. रविवारी मुंबई येथे सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, शाम जाधव, समितीचे सदस्य अनिल  भामरे, किरण सोनवणे, शिवाजी पाटील, डॉ.किशोर पाटील, निलेश पाटील, मनोहर सैंदाणे, अॅड.सरजू चव्हाण, विजय पाटील, मच्छिंद्र पाटील, सागर मराठे, डॉ.दीपक मोरे, किशोर मोरे, प्रशांत मोरे, डॉ.गोकुळ  साळुंखे, शशिकांत पाटील, भूषण पाटील, शरद पाटील, शशिकांत  बेहरे, देविदास बोरसे यांच्यासह    माजी नगरसेवक विनोद चौधरी, नगरसेवक संदीप पाटील, नाना निकम, संजय साठे, संतोष वाल्हे, यशवंत चौधरी, मुकेश पवार, भूषण मोरे,  उमेश पाटील, हिरालाल रोकडे यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. शिल्पकार चंद्रजित यादव यांच्यासोबत समितीच्या वतीने याबाबत करारनामा करण्यात आला. साडेतेरा फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळा निर्माणासाठी सुमारे 43 लाख रुपये खर्च अपेक्षित असून यापोटी 21 लाख रुपयांचा धनादेश यादव यांना सोपविण्यात आला. डिसेंबर 2019 अखेर पुतळ्याच्या निर्माणाचे काम पूर्ण होणार असून 19 फेब्रुवारी 2020 ला पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. पुतळा परिसरातील सुशोभीकरण व आकर्षक विद्युतीकरणाचे काम पालिका प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेतील सर्वपक्षीय सर्व नगरसेवकांनी ठराव करून मान्यता दिली आहे. शहरवासीयांसाठी अभिमानाची बाब असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा समितीच्यावतीने दिमाखदारपणे साजरा करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील दानशूर नागरिक व शिवभक्तांनी स्वयंस्फूर्तपणे आर्थिक मदत करावी, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.