शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराचा तपास गुन्हे शाखेकडे द्याच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 12:45 IST

 रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या अमृत आहार योजनेची चौकशी करण्यात आलेल्या अहवालाबाबत आता महिला ...

 रमाकांत पाटीललोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या अमृत आहार योजनेची चौकशी करण्यात आलेल्या अहवालाबाबत आता महिला बालकल्याण मंत्रालयानेही आक्षेप घेतला असून ही चौकशी आर्थिक गुन्हे अन्वेशन शाखेकडे देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडून करावी याबाबतचा दबाव वाढत आहे. नंदुरबार जिल्ह्यात लॅाकडाऊनच्या काळात राबविण्यात आलेल्या अमृत आहार योजनेबाबत अनेक किस्से बाहेर आले. मार्च ते जुलै २०२० या काळात एकुण १७ कोटी रुपयांचा निधी आहार समितीच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले. पण या काळात जिल्ह्यातील २३०० अंगणवाड्यांपैकी जवळपास दोन हजार अंगणवाड्यांना एकाच ठेकेदारामार्फत आहार पुरविण्यात आला. वास्तविक नियमानुसार या आहाराची खरेदी स्थानिक पोषण आहार समितीतर्फे केली जाते. परंतु त्या नियमांना डावलून एकाच ठेकेदारामार्फत आहार पुरविण्यात आला. त्यातही आदिवासी भागातील बहुतांश अंगणवाड्यांना एक ते दीड महिने आहार उशीरा पोहचला. त्यामुळे या काळात कुपोषण वाढल्याचाही तक्रारी समोर आल्या. नव्हेतर प्रशासनाने केलेल्या सर्व्हेक्षणातूनही ते समोर आले आहे. या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर स्थानिक स्तरावर चौकशी झाली. त्याबाबत समाधान न झाल्याने आदिवासी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शासनाने समिती नेमून चौकशी केली. या चौकशीचा अहवाल राज्य शासनाला सादर झाला. पण महिला बालकल्याण विभागाने त्या अहवालावरही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे अन्वेशन शाखेकडे किंवा एससीबीकडून करण्याची शिफारस केली आहे.आता महिला बालकल्याण मंत्रालयानेच या संदर्भात आक्षेप घेतल्याने स्थानिक स्तरावर या प्रकरणाची चर्चा अधिकच वाढली  असून या संदर्भातील तपास गुन्हे अन्वेशन शाखेकडून झालाच पाहिजे याबाबतची मागणी जोर धरू लागली आहे. 

महाविर ट्रेड लिंक्स...  पोषण आहाराचा बहुतांश अंगणवाडींचा पुरवठा एकच ठेकेदार अर्थात महाविर ट्रेड लिंक्स, मिरची गार्डन, नंदुरबार या ठेकेदाराकडून करण्यात आला आहे. प्रत्यक्षात हा पत्ता अस्तित्वात आहे की नाही? हा संशयाचा विषय आहे. या एकाच ठेकेदाराला पुरवठा करण्याचे काम दिले कुणी? याबाबतही प्रश्नचिन्ह असून चार महिन्याच्या चाैकशीनंतरही त्याबाबतची अधिकृत माहिती पुढे आली नाही.