शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

चरणमाळ घाट ठरतोय वाहतुकीस धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 13:41 IST

लोकमत न्युज नेटवर्क नवापूर : नवापूर ते पिंपळनेर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. नवापूर ते बोकळझर फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे ...

लोकमत न्युज नेटवर्कनवापूर : नवापूर ते पिंपळनेर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. नवापूर ते बोकळझर फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण कमी असले तरी नवापूर तालुक्यातील चौकी, रायपूर, वडकळंबी, प्रतापपूर, बोरझर गावा नजीक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.नवापूर शहरातील नागरिक नाशिक, पुण्याकडे जाण्यासाठी चरणमाळ घाटमार्गे नवापूर ते पिंपळनेर मार्गाने जातात. शॉर्टकट मार्ग असल्याने वेळ व इंधनाची बचत होते. त्यामुळे वाहनचालक या रस्त्याचा वापर करतात. तसेच महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यातदेखील मोठ्या प्रमाणात भाजीपाला व पोल्ट्री व्यवसायातील   पक्षी घेऊन जाण्यासाठी वाहनांची मोठी वर्दळ असते. चरणमाळ घाटातील  रस्ता खराब झाला असून, मोठमोठे खड्डे पडले आहे. तसेच धोकेदायक वळण, तीव्र उतार, नादुरुस्त कठडे जीवघेणे ठरत आहे. दर महिन्याला तीन ते  चार अपघात होऊन अनेक नागरिकांचे बळी जात आहेत. नवापूर ते पिंपळनेर रस्ता व चरणमाळ  घाटातील दुरुस्ती करणे गरजेचे आहे. चरणमाळ घाटातील तीव्र उतारावर अवजड वाहने अनियंत्रित होऊन वळणावरील कठड्यावर जाऊन आढळतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढेल आहे. घाटातील तीव्र उतार कमी करण्यासाठी घाट कटिंग करून नवापूर ते पिंपळनेर मार्ग सुकर करावा, अशी मागणी होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे. नवापूर तालुक्यातील रायपूरपासून तर चरणमाळ घाटापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. ठेकेदार निकृष्ट दर्जाने रस्त्याची दुरुस्ती करतात, अशा ठेकेदारांना नवीन रस्त्याचे काम देऊ  नये त्यांना काळ्या यादीत टाकून चांगले ठेकेदाराची निवड करणे गरजेचे आहे. घाटातील कठडेही नादुरूस्त आहेत. तसेच एका मोठ्या वळणावर नेहमी अपघात होत असतात. त्या ठिकाणी कठडे बांधणे गरजेचे आहे. चरणमाळ घाटात रात्रीच्या दरम्यान, चोरीच्याही  घटना घडलेल्या आहेत. त्या दृष्टिकोनाने चरणमाळ घाटात नवापूर पोलीस ठाण्यांतर्गत एक पोलीस  चौकी निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच नवापूर पोलिसांनी व वनविभागाने रात्रीच्या वेळी या चरणमाळ घाटात  गस्त घालण्याची मागणी केली जात आहे.