शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

शिस्तभंगानंतर पदभार काढण्याच्या सीईओंच्या आदेशांकडे झाले दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST

२०१६-१७ या आर्थिक वर्षात मोबाईल मेडिकल युनिटमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी झाल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने त्रिस्तरीय समिती नियुक्त केली होती. ...

२०१६-१७ या आर्थिक वर्षात मोबाईल मेडिकल युनिटमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी झाल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने त्रिस्तरीय समिती नियुक्त केली होती. समितीने मोबाईल मेडिकल युनिटमध्ये केलेल्या खर्चाचा हिशेब गोळा करत युनिट चालवणारे तत्कालीन तालुका वैद्यकीय अधिकारी हे दोषी असल्याचा अहवाल तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आर.बी. सोमवंशी यांनी दिला होता. हा अहवाल गांभीर्याने घेत तिघांना नोटिसा बजावत शासनाकडून प्राप्त निधीचा दुरुपयोग करून प्रशासनात नियमबाह्य व गैरवर्तन केल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या कलम तीनचे उल्लंघन केल्यामुळे शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र असल्याचे म्हटले होते. यातून ही चाैकशी अपूर्ण असल्याने त्यांच्याकडील पदभार काढून घेणे क्रमप्राप्त होते; परंतु यातील दोघे तालुका वैद्यकीय अधिकारी, तर एक वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आरोग्य विभागातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार चाैकशी अपूर्ण असल्याने तिघांकडील पदभार काढणे अपेक्षित होते; परंतु तशी कोणतीही कार्यवाही गेल्या चार वर्षांत झालेली नाही. तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना आर्थिक व्यवहारांसाठी शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे असतानाही तिघांकडून तशी पूर्तता न झाल्याने हा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उजेडात आले होते.

दरम्यान वावडी, ता. नवापूर मेडिकल युनिटमधील गैरव्यवहाराच्या आरोपांखाली चाैकशी करण्यात आलेले डाॅ. शशिकांत वसावे अद्यापही नवापूरचे तालुका वैद्यकीय अधिकारी आहेत. सध्या ते वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती देण्यात आली आहे. धनाजे, ता. धडगाव येथील युनिटमधील गैरव्यवहाराचे आरोप असलेले डाॅ. दिनेश वळवी हे धडगाव तालुका वैद्यकीय अधिकारी आहेत तर बोरद युनिटमधील गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आलेल्या डाॅ. रेखा शिंदे या सध्या बोरद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी आहेत. ज्या आरोग्य केंद्राच्या युनिटमध्ये गैरव्यवहार झाला त्याचा ठिकाणी त्या वैद्यकीय अधिकारी असल्याने आरोग्य विभागातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.