शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातही कारोनाबाबत खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धडगाव तालुका प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपययोजना आखण्यात येत आहे. तालुका आपत्ती व्यवस्थापन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धडगाव तालुका प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपययोजना आखण्यात येत आहे. तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेत अनेक कोरोनावर मात करण्यासाठी ठिकठिकाणी प्रवाशांची तपासणी देखील करण्यात येत आहे.यानिमित्त घेण्यात आलेल्या बैठकीत तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, पोलीस निरीक्षक एस.डी.गवळी, तालुका वैद्यकीय अधिकारी दिनेश बढे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष परमार यांच्यासह राज्य परिवहन महामंडळाचे प्रतिनिधीही उपस्थित होते.या बैठकीत राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव टाळण्यासाठी धडगाव तालुक्यातील सर्वच यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यात महसुल, आरोग्य, पोलीस प्रशासन शिक्षण विभाग व एस.टी.महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. या उपायोजनांतर्गत धडगाव येथील उदय नदीजवळ शहादाकडून येणाऱ्या प्रत्येक बसेसमधील प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. तर तोरणमाळकडे जाणºया वाहनांमधील प्रवाशांची लेगापाणी ता. धडगाव येथे आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात येत आहे. धडगाव येथील तपासणी पथकात डॉ. आश्विनी शिंदे, डॉ.पन्नालाल पावरा, आरोग्य सेवक सुर्यवंशी, गणेश अहिरे, परिचारिका शिंदे, तर लेगापाणी येथी तपासणीसाठी डॉ. गिरासे व डॉ.रावले यांचे पथक कार्यान्वित आहे.दुर्गम भागात होणाºया प्रवासी वाहतुक सेवेत खाजगी सेवा आघाडीवर आहे. परंतु जिपगाड्यांच्या टपावर व आजूबाजूला प्रवासी लटकवून प्रवासी वाहतुक होत असल्याने ही सेवा धोक्याची ठरते. यानिमित्त घेण्यात आलेल्या बैठकीत अशी वाहतुक पूर्णत: बंद करण्यात आली.

धडगाव येथे सोमवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्यात आला असून कुठल्याही व्यापाºयाने बाजारासाठी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.