शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणाला आले आणि जेवण करून परत गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST

जिल्हा परिषदेच्या बालविकास प्रकल्पांतर्गत अनुसूचित जमाती उपयोजना निधीतून तळोदा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे प्रशिक्षण ...

जिल्हा परिषदेच्या बालविकास प्रकल्पांतर्गत अनुसूचित जमाती उपयोजना निधीतून तळोदा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे प्रशिक्षण तळोदा येथील साईबाबा मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यात सर्व तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे प्रशिक्षण शिबिर याअंतर्गत घेण्यात येत आहे. त्यानुसार मंगळवारी तळोदा तालुक्यातील ६० अंगणवाडी सेविकांना या प्रशिक्षण शिबिरासाठी बोलावण्यात आले होते.

या प्रशिक्षणाची माहिती अंगणवाडी सेविकांना मंगळवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास देऊन प्रशिक्षणस्थळी साडेअकरा वाजेपर्यंत हजर होण्याच्या सूचना अंगणवाडी सेविकांना दिल्या होत्या. साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास बोलविण्यात आलेल्या अंगणवाडी सेविका हजर झाल्या. प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनाला गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी येणार असून ते आले की प्रशिक्षणाला सुरुवात केली जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र दोन वाजले तरी दोन्ही अधिकारी उपस्थित न होऊ शकले नाही. अकरा ते दोन वाजेपर्यंत अंगणवाडी सेविका या प्रशिक्षणस्थळी असणाऱ्या डोक्यावर सूर्य आला असताना झाडाच्या सावलीचा आडोसा घेत ताटकळत बसून होत्या.

दोन्ही अधिकारी उपस्थित होणार नाही हे लक्षात आल्यानंतर अंगणवाडी सेविकांना जेवणासाठी आयोजकांकडून घेऊन जाण्यात आले. जेवणानंतर प्रशिक्षण होईल असे त्यांना सांगण्यात आले. मात्र जेवण झाल्यानंतर त्यांना आपापल्या घरी-गावी जा, अशा सूचना देण्यात आल्या. त्यामुळे अनेक अंगणवाडी सेविकांचा पारा चढला. नुसता खायला एवढ्या उन्हातान्हात बोलावले व बसवून ठेवले, अशा शब्दात काही अंगणवाडी सेविकांनी आपला रोष व्यक्त करून दाखवला. जेवण्याच्यावेळी बॅनर धरून फोटो काढण्यात आल्याचीही चर्चा अंगणवाडी सेविकांमध्ये होती.

प्रशिक्षणाचा अट्टहास का?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सार्वजनिक कार्यक्रम, शाळा-महाविद्यालय बंद ठेवण्याची शासनाची भूमिका असताना अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या प्रशिक्षणाचा अट्टाहास का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. जरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असले तरी प्रशिक्षणस्थळी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना दिसून आल्या नाही. मार्च एण्डिंगमुळे ३० मार्चला अंगणवाडी सेविकांना बोलवून जेवण देऊन प्रशिक्षण उरकण्यात आल्याने निधी खर्च करण्यासाठी प्रशिक्षण घेण्यात आले नाही ना? असा प्रश्नही विचारण्यात येत आहे. हे प्रशिक्षण फक्त नावाला घेण्यात आले की काय याबद्दल उलटसुलट चर्चा आता रंगू लागली आहे.

जिल्ह्यातील एकूण दोन हजार १८४ लाभार्थी असून प्रति लाभार्थी एक हजार १९० रुपये असून नंदुरबार जिल्ह्यातील या सर्व तालुक्यातील अनुसूचित जमाती क्षेत्रात येणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी २५ लाख ९९ हजार ६०० इतकी रक्कम प्रशासनाने निधी मंजूर केलेला आहे.

जिल्हा जिल्हास्तरावरून या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मी दिवसभर मार्चअखेर असल्याने अंगणवाडी बांधकामासंबंधी कामात व्यस्त होतो. या प्रशिक्षण शिबिराबाबत वरिष्ठ स्तरावरून मिळाल्या आदेशानुसार आम्ही अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षणाला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

-भाऊसाहेब बोरकर, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, तळोदा