बहिणीच्या शेतात आग लावून चारा व लाकूड जाळले, भावाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST2021-04-24T04:30:39+5:302021-04-24T04:30:39+5:30

नंदुरबार : बहिणीच्या शेतात भावाने चारा व लाकूड जाळून ३० हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना आमरसपाडा, ता. नवापूर ...

Burning fodder and wood in sister's field, crime against brother | बहिणीच्या शेतात आग लावून चारा व लाकूड जाळले, भावाविरुद्ध गुन्हा

बहिणीच्या शेतात आग लावून चारा व लाकूड जाळले, भावाविरुद्ध गुन्हा

नंदुरबार : बहिणीच्या शेतात भावाने चारा व लाकूड जाळून ३० हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना आमरसपाडा, ता. नवापूर येथे घडली. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोलघर येथील गवरलाल छगन जगताप व त्यांची बहीण यांच्यात वाद होता. त्या वादातून गवरलाल याने बहिणीच्या शेतातील चारा व पिकांना आग लावून दिली. त्यात ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यात १० हजार रुपयांचा ज्वारीचा कडबा, पाच हजार रुपयांचे तुरीच्या काड्यांचा चारा, १५ हजार रुपये किमतीचे जळाऊ लाकूड यांचा समावेश आहे.

याबाबत राजू जयसिंग चौरे यांनी फिर्याद दिल्याने विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार विश्वास गावीत करीत आहेत.

दरम्यान, संशयिताचा शोध सुरू असून लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती तपासी अंमलदार गावीत यांनी दिली.

Web Title: Burning fodder and wood in sister's field, crime against brother