शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट बांधकामामुळे इमारत निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ओहवा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लाखो रुपये खर्च करून इमारतीचे बांधकाम ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ओहवा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लाखो रुपये खर्च करून इमारतीचे बांधकाम करण्यात आले. मात्र निकृष्ट बांधकामामुळे गेल्या दोन वर्षापासून या इमारतीत अद्यापपावतो दवाखाना सुरू करण्यात आला नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. ओहवा येथील आरोग्य केंद्र इमारतीच्या दुरवस्थेमुळे वैद्यकीय अधिका:यांच्या निवासस्थानी तात्पुरता दवाखाना सुरू करण्यात आला असून रूग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळत नसल्याचे रूग्णांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी सकाळपासून कुवा या गावातून पायपीट करीत साक:या दिला पाडवी, शांती डेमश्या वसावे, सुरती रेमश्या वसावे हे रूग्ण उपचारासाठी आले. परंतु अनेक वेळाच्या प्रतिक्षेनंतरही वैद्यकीय अधिकारी वा कर्मचारी आले नसल्याचे त्यांनी सांगितले. ही बाब नित्याचीच असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.  अतिदुर्गम भागातील ओहवा येथे आदिवासी जनतेच्या आरोग्याच्या सोयीसुविधांसाठी लाखो रुपये खर्च करून गेल्या दोन वर्षापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात आलेली आहे. मात्र या इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून इमारतीचा कोणता भाग केव्हा कोसळेल तेही सांगता येत नाही. पावसाळ्यात तर संपूर्ण इमारतीला गळती लागते. भिंती, कॉलम, बिम यांना मोठे तडे गेलेले आहेत. इमारतीचा मागील भाग मोडकळीस आला आहे. खिडक्यांच्या काचा फूटून मोकळे झाले आहे. पिण्याच्या पाण्याची व वापरण्याच्या पाण्यासाठी कुपनलिका नसल्याने संडास-बाथरुममध्ये वापरण्यासाठी पाण्याची व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. शासन आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी करोडो रुपये खर्च करते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती अगदी विदारक दिसून येते. याकडे कोणाचेही लक्ष वा नियंत्रण नसल्याचे बोलले जात आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामासह वैद्यकीय अधिकारी व दांडी बहाद्दर कर्मचारी यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.