शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भावांची चुकामूक झाली आणि अपहरणाची चर्चा रंगली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चिखली आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याच्या अपहरणाच्या नाट्यावर अखेर त्याच्याच भावाच्या खुलाशानंतर पडदा पडला. यामुळे मात्र, अपहरणाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चिखली आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याच्या अपहरणाच्या नाट्यावर अखेर त्याच्याच भावाच्या खुलाशानंतर पडदा पडला. यामुळे मात्र, अपहरणाच्या संशयावरून एकच खळबळ उडाली होती. याबाबत म्हसावद पोलिसात नोंद करण्यात आली आहे.मुळचा नंदलवड, ता.धडगाव येथील रहिवासी व चिखली आश्रमशाळेत शिकणारा गणेश हुरता वळवी (१३) या विद्यार्थ्याचे चिखली फाट्यावरून दोन दिवसांपूर्वी रिक्षा चालकाने अपहरण केल्याची माहिती त्याचा भाऊ फिनीश हुरता वळवी (१२) याने दिली होती. यामुळे आश्रम शाळा प्रशासन आणि मुलाच्या नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली होती. गणेश वळवी याचा ठिकठिकाणी शोध घेण्यात येत होता. पोलिसातही नोंद झाली. परंतु मुलाचे वडिल हुरता जत्र्या वळवी यांनी फिनीश यास विश्वासात घेवून त्याच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर या सर्व घटनेचा उलगडा झाला. फिनिश याच्या माहितीनुसार, गावाहून परत आल्यावर चिखली फाट्यावर उतरलो, परंतु कुठल्याही रिक्षात बसलो नाही. बुडीगव्हाण गावात एका घराच्या बांधकामाच्या ठिकाणी रात्रभर मुक्काम केला. त्यानंतर जंगलात थांबलो. तेथे आमची चुकामूक झाली. २७ रोजी चिखली फाट्याजवळ उभा असतांना आश्रमशाळा शिक्षक जाधव यांना तो दिसला. त्यावेळी गणेश याने अपहरणाचा बनाव रचल्याचे त्याने स्पष्ट केले. भाऊ व आपली चुकामूक झाल्याने शेतात थांबलो होतो असेही त्याने सांगितले. त्यानंतर फिनिश देखील गवसला. ही बाब पोलिसांसमोर कथन झाल्याने या वादावर अखेर पडदा पडला.दरम्यान, याबाबत हुरता जत्र्या वळवी यांनी म्हसावद पोलिसात फिर्याद दिली होती. सहायक निरिक्षक किरण पवार यांनी लागलीच तपासाची चक्रे फिरविण्यास सुरुवात केली. त्यावरून विद्यार्थ्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या उलगड्यानंतर पोलिसांना आणि आश्रमशाळा व्यवस्थापनालाही हायसे वाटले. मुलाचे वडिल हुरता वळवी यांनीही गैरसमजुतीतून फिर्याद दिल्याचे पोलिसात लिहून दिले.

असे झाले बनावट अपहरण... चिखली आश्रम शाळेत जाण्यासाठी एका रिक्षात बसलो, आश्रमशाळाकडे न जाता रिक्षा चालकाने डिझेल भरावयाचे असल्याचे सांगून रिक्षा बुडीगव्हाण गावाकडे वळविली. आपण घाबरून चालत्या रिक्षातून उडी मारली. त्यामुळे आपण बचावलो. गणेश याचे काय झाले माहिती नाही, रिक्षा चालक कुठे घेवून गेला माहिती नसल्याचे फिनिश याने सांगितले होते.