लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील मलकवाडा भागात पतंग उडवणाऱ्या बालकाचा तोल जावून छतावरुन पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली़ घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे़शनिवारी दुपारी मलकवाडा भागात रऊफ फारुख पिंजारी (१५) हा मुलगा परिसरातील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरुन पतंग उडवत असताना अचानक तोल जावून खाली पडला़ यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला़ त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, त्याला मृत घोषित करण्यात आले़ याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास हवालदार चव्हाण करत आहेत़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}