शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

दोघांना डांबून खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 12:26 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : प्रकाशा रस्त्यावर लांबोळा गावालगत ट्रक अडवून चालकाच्या खिशातून जबरीने पैसे काढून घेत चालक आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : प्रकाशा रस्त्यावर लांबोळा गावालगत ट्रक अडवून चालकाच्या खिशातून जबरीने पैसे काढून घेत चालक आणि क्लिनर या दोघांना डांबून ठेवत अडीच लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना शहादा पोलीसांनी अटक केली आहे़ गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा गुन्हा घडला़रामलाल किसनलाल आरोडा रा़ राजस्थान हा ट्रकचालक गुरूवारी पहाटे मध्यप्रदेशातील इंदौर येथून शहादा मार्गाने गुजरातकडे निघाला होता़ दरम्यान पहाटे अडीच वाजेच्या चौघांनी लांबोळा गावाजवळ ट्रकच्या समोर दुचाकी वाहन आडवे करुन चौघांनी ट्रकला थांबवले होते़ यावेळी चौघांनी चाकूचा धाक दाखवत ट्रकमध्ये प्रवेश करुन चालक रामलाल याच्या खिशातील पाच हजार रूपये काढून घेतले होते़ या प्रकारावर न थांबता चौघांनी चालक आणि क्लिनर या दोघांनाही ट्रकसह सोबत घेत शहादा शहरालगतच्या एका हॉटेलमध्ये डांबून ठेवत त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांची मागणी केली होती़ खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी देत चौघांनी मारहाण केली होती़ या प्रकाराची कुणकुण सकाळी पोलीसांना लागल्यानंतर त्यांनी शहादा शहरालगत असलेल्या त्या हॉटेलमध्ये धाव घेतली होती़ दरम्यान पोलीस आल्याचे पाहून एकाने पळ काढला तर तिघे पोलीसांच्या तावडीत सापडले़ ताब्यात घेण्यात आलेल्यांनी लल्लू शर्मा, विशाल पाटील, दीपक शर्मा आणि वैभव भावसार अशी स्वत:ची ओळख दिली आहे़ यातील लल्लू शर्मा हा फरार झाला आहे़चौघांविरोधात दुपारी शहादा पोलीस ठाण्यात ट्रकचालकाच्या फिर्यादीवरुन दरोडा आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ चौघांना गुरुवारी शहादा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़दुपारी घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी याठिकाणी भेट देत माहिती घेतली आहे़ घटनेची शहरात चर्चा सुरू असून चौघा संशयितांनी यापूर्वीही असा गुन्हा केला आहे किंवा कसे याचा तपास पोलीसांकडून करण्यात येत आहे़ फरार झालेला लल्लू शर्मा याचा पोलीसांकडून शोध घेण्यात येत