नंदुरबार तालुक्यात पुस्तक वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 12:41 IST2020-06-16T12:41:11+5:302020-06-16T12:41:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : समग्र शिक्षा अभियानांतर्गत तालुक्यात मोफत पुस्तक वाटप योजनेचा शुभारंभ करण्यात आला़ यांतर्गत पहिल्याच दिवशी ...

Book distribution in Nandurbar taluka | नंदुरबार तालुक्यात पुस्तक वाटप

नंदुरबार तालुक्यात पुस्तक वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : समग्र शिक्षा अभियानांतर्गत तालुक्यात मोफत पुस्तक वाटप योजनेचा शुभारंभ करण्यात आला़ यांतर्गत पहिल्याच दिवशी शालेय स्तरावर पुस्तके देण्यात आली आहेत़
शनिवारी तालुकास्तरावरुन शालेय स्तरापर्यंत पुस्तके पोहोच करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ पंचायत समितीच्या उपसभापती लताबाई पाटील, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, गटशिक्षणाधिकारी डॉ़ राहुल चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी डी़जी़वसावे, एस़एऩपाटील, सचिन गोसावी, यांच्या हस्ते गाडीला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला होता़ २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात मागणीनुसार तालुक्यात ९५ टक्के क्रमिक पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत़ यांतर्गत सोमवारी शाळास्तरावर पुस्तके शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचती केली आहेत़ शिक्षकांनी घरी जावून विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले आहे़ कोविड-१९ च्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करत या पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे़ शालेयस्तरावर विविध मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरुपात पुस्तके देण्यात आली़ यंदा कोरोनाचे संकट असतानाही दरवर्षाप्रमाणे १५ जूनपूर्वी निर्धारित वेळेत पुस्तकं पोहोचवण्यात आली आहेत़ याबाबत गटशिक्षण विभागाने नियोजन करुन शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक योजनेचा लाभ मिळवून दिला आहे़ गटशिक्षणाधिकारी डॉ़ राहुल चौधरी व शिक्षण विस्तार अधिकारी सचिन गोसावी यांनी हे नियोजन केले होते़
दरम्यान १५ जून रोजी सर्व विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके देण्याच्या सूचना केल्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ़ चौधरी यांनी सांगितले़

Web Title: Book distribution in Nandurbar taluka