शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

कळंबू येथे विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST

शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास कळंबू गावालगत असलेल्या पडक्या विहिरीजवळ लहान मुले खेळत असताना त्यांना विहिरीतून दुर्गंधी येऊ लागल्याने ...

शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास कळंबू गावालगत असलेल्या पडक्या विहिरीजवळ लहान मुले खेळत असताना त्यांना विहिरीतून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती सारंगखेडा पोलिसांना देण्यात आली. सारंगखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश शिरसाठ, पो.कॉ. विजय गावित, ठाणसिंग गिरासे यांनी घटनास्थळी भेट देऊन विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह कल्पेश दगडू पाटील (३५) या तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले. हा तरुण ५ मे रोजी सायंकाळी चार वाजेपासून घरातून बेपत्ता झाला होता. त्याला दारूचे व्यसन असल्याने याआधीही अधूनमधून बेपत्ता असायचा. मात्र दोन-तीन दिवसांपासून घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला असता तो मिळून आला नव्हता. वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजन दुगड यांनी घटनास्थळी मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत सारंगखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.