राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:29 IST2021-04-15T04:29:34+5:302021-04-15T04:29:34+5:30

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या ...

Blood donation camp by NCP | राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंदुरबार शहरध्यक्ष नितीन जगताप यांच्या प्रयत्नातून येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ५० दात्यांनी रक्तदान केले. या वेळी राष्ट्रवादी कॉग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस कमलेश चौधरी, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, केसरसिंग क्षत्रिय, राऊ मोरे, महिला जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. अश्विनी जोशी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, प्रवक्ता सेल जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश भोई, सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे, शहर उपाध्यक्ष पंकज पाटील, राजा ठाकरे, ओबीसी जिल्हा सरचिटणीस स्वप्निल पाटील, विद्यार्थी संघटक अविनाश चव्हाण, हर्षदा देशमुख, कुशल मोरे, जितेंद्र कोकणी, हेमंत बिरारे, नीलेश चौधरी, संदीप बच्छाव व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp by NCP