वडछील येथे ५० दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST2021-07-22T04:20:02+5:302021-07-22T04:20:02+5:30

सामाजिक कर्तव्य म्हणून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात विविध गावांमध्ये व शहरांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले ...

Blood donation of 50 donors at Vadchil | वडछील येथे ५० दात्यांचे रक्तदान

वडछील येथे ५० दात्यांचे रक्तदान

सामाजिक कर्तव्य म्हणून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात विविध गावांमध्ये व शहरांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. ‘लोकमत’ व विविध शहर ग्राम गुजर ग्लोबल मित्र मंडळ (व्हीएसजीजीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने वडछील येथील शिबिरात ५० दात्यांनी रक्तदान केले. प्रारंभी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे छोटूलाल नथ्थू पाटील, रामदास अर्जुन पाटील, ओंकार सोमजी पाटील, शिवदास रोहिदास पाटील, रामदास पिरा सोनवणे, पं. स. सदस्य कैलास वसावे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शिबिरात वडछील येथील राकेश सुकलाल गिरासे या तरुणाने २१व्या वेळी रक्तदान केले. जिल्ह्यातील एक हजार ५०१ व्या म्हणजे शेवटची रक्तबॅग वडछील येथील सुनील पाटील यांनी रक्तदान करून या शिबिराची सांगता केली. यावेळी व्हीसएसजीजीएमचे सदस्य, सुनील पाटील, संजय पाटील, कल्पेश पाटील, प्रतीक पाटील, संदीप पाटील, गणपत गिरासे, ऋषीकेश गिरासे, धनंजय पाटील, उमेश पाटील, हर्षल पाटील, गोलू पाटील, नीलेश पाटील, नारायण पाटील, अमोल पाटील, लोकेश पाटील उपस्थित होते. धुळे येथील नवजीवन ब्लड बँकेचे संचालक डॉ. सुनील चौधरी, रोहिदास जाधव, गजानन चौधरी, कैलास पटेल, चंद्रकांत दंडगव्हाळ, पांडुरंग गवळी यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Blood donation of 50 donors at Vadchil