वडाळीत २७ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:20 IST2021-07-04T04:20:59+5:302021-07-04T04:20:59+5:30

कोरोना महामारीमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सामाजिक कर्तव्य म्हणून २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात ...

Blood donation of 27 donors in Wadali | वडाळीत २७ दात्यांचे रक्तदान

वडाळीत २७ दात्यांचे रक्तदान

कोरोना महामारीमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सामाजिक कर्तव्य म्हणून २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ व विविध शहर ग्राम गुजर ग्लोबल मित्रमंडळ (व्हीएसजीजीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने वडाळी, ता. शहादा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला नवनाथ सेवाभावी संस्थेचे सहकार्य लाभले.

पंचायत समितीचे माजी सदस्य गिरीश जगताप यांनी महादेव मंदिरात पूजन करून व माजी सरपंच दीपक सजन पाटील यांनी दीपप्रज्वलन करुन शिबिराचा प्रारंभ झाला. यावेळी दीपक गोरख पाटील यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. शिबिरात २७ दात्यांनी रक्तदान केले. तसेच ३० जणांनी नोंदणी केली. जे नोंदणी केलेले तरुण आहेत त्यांना कोरोना लस घेऊन १० ते १२ दिवस झाले आहेत. त्यामुळे ते पुढे होणाऱ्या शिबिरात रक्तदान करणार आहेत. शिबिराला डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. योगेश पाटील, महेंद्र जगताप, उमेश पाटील, उपसरपंच हिंमत सोनवणे, चंद्रकांत रायसिंग, पोलीस पाटील गजेंद्र गोसावी, अनिल चौधरी, अरुण जाधव, नरेंद्र पाटील, सतीश पाटील, दिनेश पाटील, सुनील माळी, बाबू मन्यार, हितेश पटेल, किशोर चौधरी, शुभम पाटील, ऋषीकेश पाटील आदी उपस्थित होते. शिबिराला धुळे येथील नवजीवन ब्लड बँकेचे कर्मचारी दिलीप जाधव, चंद्रकांत दडगवान, गजानन चौधरी आदींनी सहकार्य केले.

Web Title: Blood donation of 27 donors in Wadali