शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

जयनगर येथे २६ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

सामाजिक कर्तव्य म्हणून २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात विविध गावांमध्ये व शहरांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन ...

सामाजिक कर्तव्य म्हणून २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात विविध गावांमध्ये व शहरांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ व विविध शहर ग्राम गुजर ग्लोबल मित्र मंडळ (व्हीएसजीजीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने जयनगर येथे मंगळवारी शिबीर झाले. युनिक फाउंडेशनचे जितेंद्र पाटील, सरपंच मिनाबाई सोनवणे, उपसरपंच सुनील माळी, विश्वनाथ पाटील यांनी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर खाज्या नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. जितेंद्र पाटील व विश्वनाथ पाटील यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. या शिबिरात जयनगर व कोंढावळ गावातील २६ दात्यांनी रक्तदान केले. तसेच पाच जणांनी नोंदणी केली आहे. जे नोंदणी केलेले तरुण आहेत त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेऊन चार ते पाच दिवस झाले आहेत, ते पुढे होणाऱ्या शिबिरात रक्तदान करणार आहेत. शिबिराला युनिक फाउंडेशनचे सहकार्य लाभले. शिबिरास माजी सरपंच अर्जुन सोनवणे, माजी उपसरपंच संदीप माळी, अंकुश सोनवणे, हर्षल पाटील, दशरथ पाटील, अतुल माळी, गोपाल माळी उपस्थित होते. शिबिरासाठी ‘लोकमत’चे जयनगर प्रतिनिधी किशोर रामदास माळी व कोंढावळचे प्रतिनिधी जगदीश अहिरे, दादा करंजे, मोहन माळी यांनी परिश्रम घेतले.