शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

शेजारच्या गुजरात राज्यातील उच्छलमध्ये बर्ड फलूची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST

नवापूर तालुक्यातील २२ पोल्ट्रीमधील बर्ड फ्लू अहवाल एच ५एन ८ विषाणू बाधित होते. परंतू गुजरात राज्यातील नॅशनल पोल्ट्रीतील बर्ड ...

नवापूर तालुक्यातील २२ पोल्ट्रीमधील बर्ड फ्लू अहवाल एच ५एन ८ विषाणू बाधित होते. परंतू गुजरात राज्यातील नॅशनल पोल्ट्रीतील बर्ड फ्लू अहवाल एच ५एन १ आला आहे. परंतु या पोल्ट्रीतील संचालक अनीस टिमोल यांनी सांगितले की, येथील पोल्ट्रीत पक्ष्यांचा मृत्यू झालेला नाही. गुजरात राज्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी नियमित तपासणी करीत आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तापी जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन पोल्ट्रीतील पक्षी नष्ट करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान याबाबत नवापूरचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना संपर्क केला असता, उच्छलच्या नॅशनल पोल्ट्रीनजीक महाराष्ट्रातील एक किलोमीटर परिसरात किती पोल्ट्री येतात याची पाहणी करून पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसह चर्चा करून पुढील किलिंग ऑपरेशन ठरविण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. गुजरात राज्यातील उच्छल येथील नॅशनल पोल्ट्रीत १९७२ साली सुरू करण्यात आली आहे. नवापूर परिसरातील सर्वांत जुनी पोल्ट्री आहे. यात एकूण १७ हजार कुकुट पक्षी आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गुजरात राज्यातील पथक पाहणीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहे. नवापुरात बर्ड फ्लूची लागण झाल्याने गुजरात राज्यातील सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र पोलिसांनी बंदोबस्त दिला होता. या संदर्भात उच्छल पोलिसांना कुठलीही माहिती नव्हती. उच्छल पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिराने पोलिस बंदोबस्त दिला होता. गुजरात राज्यात बर्ड फ्लू लागण होऊ नये, म्हणून महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांकडून काळजी घेण्यात आली. परंतू गुजरात राज्यातील अधिकाऱ्यांकडून काही अंशी दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी शेजारील गुजरात मधील तापी व डांग जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना नवापूरच्या संदर्भात खबरदारी म्हणून माहिती देण्यात आली होती. त्यानंतर देखील गुजरात राज्यात बर्ड फ्लू शिरकाव झाला. नवापूर तालुक्यात फेब्रुवारी २००६ नंतर दुसऱ्यांदा ६ फेब्रुवारी २०२१ ला बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने आठवड्याभरात राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन २४ पोल्ट्रीत राबविण्यात आले. यात एकूण ५ लाख ७८ हजार ८९० कुकुट पक्षी नष्ट केले तर २५ लाख १३ हजार ३९२ अंडी नष्ट करण्यात आली आहे. उर्वरित पाच पोल्ट्रीतील किलिंग ऑपरेशन पुढील आदेश आल्यावर मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.