शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीचा आरसा हा केवळ केस विंचरण्यापुरता आणि फॅशनसाठीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  दुचाकी वाहनांना लावण्यात येणारे दोन बाजुंना दोन आरसे हे वाहतुकीच्या नियमांच्या दृष्टीकोणातून लावले  जातात. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  दुचाकी वाहनांना लावण्यात येणारे दोन बाजुंना दोन आरसे हे वाहतुकीच्या नियमांच्या दृष्टीकोणातून लावले  जातात. शिवाय चालकाला मागून कोणते वाहन येत आहे हे पहाण्यासाठी देखील आवश्यक असतो. परंतु या आरशांचा उपयोग केवळ १० ते १५ टक्केच केला जात असल्याचा अंदाज आहे.                  आरसे दुचाकीचे शो वाढविण्यासाठी किंवा केस विंचरण्यासाठीच होतो की काय? असा प्रश्न उपस्थित होतो. स्पोर्ट बाईक आणि जास्त सीसीच्या वाहनांचे तर आरसे काढून त्या ठिकाणी शोचे वस्तू लावले जातात. वास्तविक साईड ग्लास अर्थात दोन्ही बाजुंच्या आरसे नसल्यास वाहतूक पोलिसांना दंड अकारण्याची देखील मुभा आहे. त्यासाठी किमान २००रुपये दंड आकारला जातो. साईड ग्लास राहिल्यास चालकाला मागे वळून पहाण्याची गरज नसते. हेल्मेट घातले असल्यास मागे वळून पहाण्यासाठी त्रासदायक ठरते. अशा वेळी जर साईडग्लास राहिल्यास मागील येणारे वाहन त्यातून सहज दिसून जाते. शिवाय टर्न घेतांनाही हे ग्लास फार उपयोगी पडतात.                  दुचाकी चालकांवर गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई झालेल्या आहेत. त्यात लायसन्स नसणे, हेल्मेट नसणे, साईड ग्लास नसणे, आरसीबूक व विमा नसणे अशा प्रकारच्या आणि तीन सीटच्या कारवाया झालेल्या आहेत. बुलेटचा आवाज कमी होणार                बुलेटचे ओरिजन सायलेंसर काढून नवीन सायलेंसर अर्थात मोठ्या आवाजाचे सायलेंसर बसविण्याची फॅशन आहे. याद्वारे ध्वनी व वायू प्रदूषण देखील होते. ओरिजनल कंपनीच्या सायलेंसरमध्ये फिल्टर आणि इतर आवश्यक उपकरणे असतात. त्याद्वारे ते आवाज कमी आणि वायू प्रदूषण देखील कमी करते. नंदुरबार शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक अविनाश मोरे यांनी याबाबत कारवाई सुरू केल्या आहेत. दहा बुलेटस्वारांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आल्याने अनेकांनी ओरिजनल सायलेंसर बसवून घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.  याबाबत सक्तीने कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही शहर वाहतूक शाखेतर्फे देण्यात आली.

शहरातील दुचाक ५०,०००

आरसा नाही म्हणून २०० रु. दंड              दुचाकीला आरसा नसल्यास वाहतूक पोलीस २०० रुपयांचा दंड आकारू शकतात. किमान एक साईड ग्लास दुचाकीला असणे आवश्यक आहे. दोन्ही असल्यास चांगले. शिवाय फॅशनेबल ग्लास देखील लावता येऊ शकत नाहीत.  

दुचाकीचालकांजवळ हे असणे बंधनकारक              दुचाकी चालकांकडे हेल्मेट आणि लायसन्स असणे सक्तीचे आहे. याशिवाय साईड ग्लास, आरसी बूक, इन्सूरन्स कागदपत्रे आवश्यक आहे. योग्य नंबर प्लेट असणे देखील बंधनकारक आहेत. 

दुचाकी चालकांजवळ हेल्मेट आणि लायसन्स आवश्यक आहे. साईड ग्लास, नियमानुसार नंबरप्लेट, आरसीबूक आणि इन्सूरन्स पाहिजे. या सर्व बाबींसाठी वेगवेगळे दंड आहेत. साईड ग्लासचा उपयोग फॅशनसाठी होऊ नये. नंदुरबारात सद्या बुलेट वाहनांवर कारवाई सुरू आहे. ओरिजनल सायलेंसर नसल्यास दंड आकारणार आहोत.-अविनाश मोरे, पोलीस निरिक्षक, शहर वाहतूक शाखा, नंदुरबार.