शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रस्त्याचे दोन वेळा झाले भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील नवनीत लोहार यांच्या घरापासून ते कुंभारवाड्यापर्यंतचा रस्त्याच्या डांबरीकरणाचे उद्घाटन करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील नवनीत लोहार यांच्या घरापासून ते कुंभारवाड्यापर्यंतचा रस्त्याच्या डांबरीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. काँग्रेस व भाजपने एकाच रस्त्याचे उद्घाटन केल्याने या रस्त्याचे श्रेय घेण्यावरून दोन्ही पक्षांत चढाओढ निर्माण झाली आहे. रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यावरून काँग्रेस आमदार शिरीषकुमार नाईक व भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावित यांनी एकमेकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. नवापूर नगर पालिकेकडून ५६ लाख रुपये खर्च करून हा रस्ता तयार केला जाणार आहे. सर्वांत आधी रस्त्याचा प्रारंभ भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष भरत गावीत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेश अल्पसंख्याक आघाडीचे उपाध्यक्ष एजाज शेख, प्रदेश आदिवासी आघाडीचे उपाध्यक्ष अनिल वसावे, तालुका सरचिटणीस जयंतीलाल अग्रवाल, चिटणीस हेमंत जाधव, नगरसेवक महेंद्र दुसाने, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष दिनेश चौधरी, तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे, नीलेश प्रजापत, जगदीश जयस्वाल, प्रशांत मोरे, अनिल दुसाने, हरिश्चंद्र पाटील, रमेश पाटील यांसह प्रभागातील नागरिक  उपस्थित होते.प्रभाग सातमध्ये निवडून आल्यानंतर नगरसेवक महेंद्र दुसाने यांनी प्रभागातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केल्याचा दावा केला आहे. रविवारी सकाळी प्रभाग क्रमांक सातमधील नवनीत लोहार यांच्या घरापासून ते प्रभाग क्रमांक सहामधील कुंभारवाड्यापर्यंत डांबरीकरण रस्त्याचे दुसरे उद्घाटन गुज्जर गल्ली येथे नवनीत लोहार यांच्या घराजवळ नवापूरचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे, बांधकाम सभापती आरीफ बलेसरीया, स्थानिक शिवसेना नगरसेविका अरुणा पाटील, गटनेते आशिष मावची, राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख हसमुख पाटील, बबिता वसावे, मीनल लोहार, खलील खाटीक, माजी नगरसेवक अजय पाटील, सुभाष कुंभार तसेच प्रभागातील स्थानिक नागरिक उपस्थित होते. या रस्त्यासाठी आमदार नाईक यांनी पाठपुरावा केल्याचे सांगितले. तसेच ज्यांना श्रेय घ्यायचे असेल त्यांनी घ्यावे; मात्र लोकांना चांगले माहिती आहे, रस्त्यासाठी कोणी प्रयत्न केले, अशी टीका यावेळी करण्यात आली. 

नगरपालिकाने बोगस ठेकेदारांचे लाड बंद करावेनवापूर शहरात अनेक भागांमध्ये डांबरीकरण रस्ते करण्यात आले; परंतु पहिल्याच पावसाळ्यात रस्ते उखडून गेल्याने नगरपालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. गुज्जर गल्लीतील रस्ता यापूर्वी दोन वेळा तयार करण्यात आला; परंतु काही दिवसांतच खराब झाल्याने तिसऱ्यांदा डांबरीकरण करण्यात येत आहे. बोगस काम करणाऱ्या ठेकेदारांना बाजूला करत चांगल्या ठेकेदारांना काम देणे अपेक्षित आहे. नागरिकांनी नगरपालिकेच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील दर्जेदार काम करून पालिकेने नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे महत्त्वाचे आहे.

भाजपच्या नगरसेवकांचा आंदोलनाचा इशाराभाजपने रस्त्याचे उद्घाटन केल्याने रस्त्याचे काम लगेच सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे प्रभाग क्रमांक सातमधील भाजपचे नगरसेवक महेंद्र दुसाणे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. तहसीलदार व मुख्याधिकारी नवापूर यांना निवेदनाद्वारे २६ जानेवारी रोजी थाळीनाद आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला असून, रस्ता डांबरीकरण कामाच्या प्रारंभ कार्यक्रमाला राजकीय रंग चढला आहे.दर्जेदार रस्ता तयार होणारनवापूर नगर परिषदेने एक वर्षापासून रस्ता मंजूर केला होता. कोरोनाकाळात रस्ता तयार करणे शक्य नसल्याने रविवारी आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रभागातील नागरिकांना दर्जेदार रस्ता तयार करून देण्याचे आश्वासन शिवसेनेच्या नगरसेविका अरुणा पाटील यांनी दिले आहे.