शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

हातोडा रस्त्यावर साकारण्यात येणाऱ्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

कोठार : तळोदा शहरात नगरपालिका निधीतून हातोडा रस्त्यावर साकारणार येणाऱ्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते ...

कोठार : तळोदा शहरात नगरपालिका निधीतून हातोडा रस्त्यावर साकारणार येणाऱ्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रवेशद्वाराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ असे नामकरण करण्यात येणार आहे.

तळोदा येथे नगरपालिकेच्या निधीतून हातोडा रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या प्रवेशद्वाराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ असे नामकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर करून या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले.

या भूमिपूजन कार्यक्रमाला नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी, तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, सुभाष चौधरी, नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, माजी नगरसेवक सतिवन पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाडवी, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष आनंद सोनार, शिवसेनेचे गौतम जैन, शिरीष माळी, राणीपूर ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वळवी, माजी उपनगराध्यक्ष अनुप उदासी, डॉ. स्वप्नील बैसाणे, प्रा. विलास डामरे, नगरसेवक सुरेश पाडवी, जालंधर भोई, यशवंत पाडवी, पंचायत समिती सदस्य विजयसिंह राणा, भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस प्रवीणसिंह राजपूत, शानूबाई पाडवी, जगदीश परदेशी, गोपी पावरा यांच्यासह पंचायत समिती सदस्य व विविध गावचे सरपंच व मान्यवर उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.

या प्रवेशद्वारामुळे नंदुरबारकडून तळोदा शहरात प्रवेश करताना लागणारा हातोडा रस्त्याचा चेहरामोहरा बदलणार असून, शिवाजी महाराजांचे नाव प्रवेशद्वाराला दिल्यामुळे शहराचा सांस्कृतिक वसा जपण्यास मदत होणार आहे. या प्रवेशद्वाराला शिवाजी महाराजांच्या नाव देण्याला सर्वांनी सहमती दर्शविली असून, महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचे नामकरण हातोडा रस्त्यावरील प्रवेशद्वाराला देण्यात आल्याने समाधान व्यक्त होत असल्याचे भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी यांनी सांगितले.