शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

उपनगराध्यक्षपदी भारती राजपूत यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 11:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदावर भारत अशोक राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ शुक्रवारी आयोजित करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदावर भारत अशोक राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभा त्यांची निवड झाली़ यावेळी वर्षभराचा कार्यकाळ असलेल्या चार स्वीकृत सदस्यांचीही निवड करण्यात आली़नगरपालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली़ सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी होत्या़ प्रसंगी पालिका मुख्याधिकारी डॉ़ बाबुराव बिक्कड यांच्यासह सत्ताधारी गटाचे नगरसेवक उपस्थित होते़ मावळते नगराध्यक्ष परवेज खान यांच्यासह चार स्वीकृत सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली होती़ उपनगराध्यक्ष पदासाठी भारती राजपूत यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता़ तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी काँग्रेसतर्फे दिलीप राघो बडगुजर, रहेमतउल्ला अमानउल्ला इनामदार, मनोज रामसिंग चव्हाण यांनी तर भाजपाकडून कमल ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता़ या चौघांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी विशेष सभेत केली़दरम्यान सभेवर भाजपाचे केवळ तीनच नगरसेवक उपस्थित होते़ त्यांच्याकडून ठाकूर यांच्या निवडीचे पत्र दिले गेले़ यामुळे विरोधी गटाच्या खुर्च्या रिकाम्या असल्याचे चित्र सभागृहात दिसून आले़स्विकृत नगरसेवक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या चारही सदस्यांसह उपनगराध्यक्ष भारती राजपूत यांचा पालिका आवारातच सत्कार करण्यात आला़ यावेळी राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ फटाक्यांसह पुष्पवृष्टी करुन आनंद व्यक्त करण्यात आला़प्रभाग १९ मधून निवडून आलेल्या भारती राजपूत यांचे त्यांच्या प्रभागातील नागरिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले़