शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी तार्इंना भाऊबिजचा उशिरा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गरोदर माता व बालकांसाठी जीवनदायिनींची भूमिका निभावणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन हजाराची भाऊबिज भेट ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गरोदर माता व बालकांसाठी जीवनदायिनींची भूमिका निभावणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन हजाराची भाऊबिज भेट देण्याचा निर्णय दिवाळीपूर्वी घेण्यात आला होता. परंतु दिवाळी उलटून दोन महिन्यांना कालावधी झाल्यानंतर या भेटीची रक्कम वाटप करण्यात आली. त्यामुळे दिवाळीच्या दोन महिन्यांनी भाऊबिज कसा साजरी करावा, असा प्रश्न उपस्थित रकरण्यात येत आहे.जिल्ह्यातील स्तनदा व गरोदर मातांसह बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी अंगणवाडी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये चार हजार ५९३ अंगणवाडी सेविका व कार्यकर्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही वर्गातील कर्मचारी सामाजात कुपोषण निर्माण न होता सुदृढ बालक, त्या बालकांची चांगली वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहे. एवढेच नव्हे तर स्तनदा व गरोदर मातांना वेळेवर व योग्य आहार पुरवठा करीत जन्मणाºया नवजात बालक सुदृढ राहावे शिवाय त्या बालकांसाठी मातांचे आरोग्यही चांगले राहावे, म्हणून प्रयत्न करीत आहे. त्यामुळे हे कर्मचारी माता - बालकांसाठी जीवनदायिनीच ठरत आहे.या कामांसाठी त्यांना मानधन दिले जात असले तरी ते त्यांच्या जबाबदारीच्या तुलनेत अगदी तटपुंजे ठरत आहे. देशाच्या जळण-घळणीत तथा देशाचे भावी व जबादार नागरिक घडविण्याच्या साखळीतील पाया हेच कर्मचारी भक्कम करीत आहे. असे असतांनाही त्यांनी अत्यल्प मानधन दिले जाते. ही सेवा बजावतांना या कर्मचाºयांना समाधानकारक दिवाळी साजरी करता येत नाही. शिवाय दिवाळीतील अवघ्या महिलांचा भाऊबिज हा उत्सवही त्यांना आनंदविनाच साजरा करावा लागतो. त्यांना हा उत्सव आनंदाने साजरा करता यावा, यासाठी दरवर्षी भाऊबिज भेट जाहिर करण्यात येते.शासनाच्या निर्णयानुसार यंदाच्या भाऊबिजसाठीही भेट देण्याचा निर्णय शासनामार्फत दिवाळीपूर्वी घेण्यात आला. अंगणवाडी कर्मचाºयांसाठी हिताचा निर्णय घेतल्याने दवाळी व भाऊबिज आनंदात साजरा करता येईल, असे अपेक्षा या कर्मचाºयांमार्फत दिवाळीपूर्वीच करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्ष दिवाळीशिवाय दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही या कर्मचाºयांना भाऊबिजच भेटीची रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत असतानाच ही रक्कम वाटप करण्यात आली आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाºयांमध्ये आनंद असला तरी भाऊबिजेचा खरा आनंद हिरावला गेल्याची खंत देखील व्यक्त करण्यात येत आहे.कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्याही तातडीने पूर्ण करण्याची मागणी संघटनेचे राज्याध्यक्ष मायाबाई परमेश्वर, युवराज बैसाणे, रामकृष्ण पाटील, अ‍ॅड.गजानन थळे, रवींद्र जाधव, सुधिर परमेश्वर, रवींद्र ब्राह्मणे, राजू पाटील यांनी केली आहे.शासनामार्फत भाऊबिज जाहिर करुनही प्रत्यक्ष लाभ दिला गेला नाही. त्यामुळे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेमार्फत काही दिवसांपूर्वी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार दि.९ डिसेंबर रोजी राज्य शासनाने निर्णय घेत अंगणवाडी कर्मचाºयांसाठी भाऊबिजची स्वतंत्र तरतुदीला मंजरी दिली. तरतुदीतील ग्रामीण व आदिवासी भागासाठी ३३ कोटी ५१ लाख ६४ हजाराचा निधी उलपलब्ध करुन देण्यात आला. त्यापैकी नंदुरबार जिल्ह्यातील चार हजार ५९३ कर्मचाºयांना प्रत्येकी दोन हजार प्रमाणे वाटप करण्यासाठी ९१ लाख ८६ हजाराचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.संघटनेने केलेल्या पाठपुराव्यानुसार अंगणवाडी कर्मचाºयांना भाऊबिज भेटीची रक्कम मिळाली परंतु, नोव्हेंबर महिन्याचे मानधनच दिले गेले नाही. त्यामुळे केवळ भाऊबिजच्या दोन हजाराच्या आनंदाला विरजण लागल्याचे म्हटले जात आहे. मानधनासाठी शासनाकडून निधीच उपलब्ध झाल्या नसल्याचे शासनामार्फत सांगण्यात येत आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन होईपर्यंत कदाचित निधी दिला जाणार नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे कर्मचाºयांना अजुन काही दिवस मानधनाशिवाय राहावे लागण्याची शक्यता आहे.