शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
4
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
5
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
6
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
7
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
8
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
9
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
10
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
11
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
12
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
13
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
14
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
15
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
16
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
17
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
18
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
19
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
20
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार, लग्नात गर्दी केली तर थेट कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लग्न समारंभात ५० पेक्षा अधीक व्यक्ती आढळून आल्यास वर, वधूंचे आई-वडील व भटजी यांच्यावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लग्न समारंभात ५० पेक्षा अधीक व्यक्ती आढळून आल्यास वर, वधूंचे आई-वडील व भटजी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे एकतर लग्न समारंभ पुढे ढकलावे किंवा गर्दीवर नियंत्रण ठेवावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात सर्वत्र दक्षता घेतली जात आहे. आवश्यक त्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आणले जात आहे. सर्व सामुहिक व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. परंतु शहरी आणि ग्रामिण भागात अजूनही लग्न समारोह मोठ्या व व्यापक प्रमाणात साजरे केले जात आहेत. अशा ठिकाणी गर्दीवर कुठलेही नियंत्रण ठेवले जात नाही. आवश्यक उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अशा ठिकाणी संसर्गाची शक्यता असते. एकीकडे प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे तर दुसरीकडे लग्न समारंभ आयोजित करणारी मंडळी कुठलीही काळजी घेत नाहीत. प्रशासनाच्या उपाययोजनांवर पाणी फिरत आहे. ही बाब लक्षात घेता आता लग्न समारंभ आयोजनावरच प्रशासनाने कडक निर्बंध आणले आहेत. याबाबत माहिती देतांना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी सांगितले, याआधीच मॅरेज लॉन्स, मंगल कार्यालये यांना बंद ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत.यापुढे कुणी बुकींग केले असतील तर ते रद्द करून द्यावे. सर्व मंगल कार्यालय व लॉन्स यांना नियमांचे आणि आदेशाचे पालन करण्याच्या सुचना लेखी स्वरूपात दिल्या आहेत. असे असतांनाही कुणी लग्न समारंभ, सार्वजनिक, सामुहिक कार्यक्रम यासठी मंगल कार्यालय, हॉल, लॉन्स उपलब्ध करून दिले तर त्यांच्यावर भादंवी कलमान्वये कारवाई करण्यात येणार आहे.घरगुती स्वरूपात आयोजित सर्व लग्न समारंभांवरही नियंत्रण आणले जात आहे. त्यासाठी ५० पेक्षा जास्त लोकांनी अशा ठिकाणी उपस्थित राहू नये यासाठी सुचना देण्यात येत आहे. त्या त्या तहसीलदारांना, पोलीस निरिक्षकांना तशा सुचना दिल्या जात आहेत.तरीही ५० पेक्षा अधीक लोकं दिसून आल्यास तेथील लग्न समारंभ आयोजित करणारे वधू व वर यांचे आई-वडील व भटजी यांच्यावर थेट कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे घरगुती स्वरूपात व मोजक्याच अर्थात ५० जणांच्या उपस्थितीतच लग्न समारंभ आयोजित करावा असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी केले आहे.अखेर आदेश... आवाहन करूनही जनता ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे लग्न समारंभामधील उपस्थितीवर मर्यादा आणाव्या लागल्या असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.कारवाईचे अधिकार... प्रशासनाला कारवाईचे अधिकार आहे. आपत्ती व्यवस्थापनव पोलीस कायद्यान्वये कारवाई होईल.