शहाद्यातील केंद्रात स्वॅब घेण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 12:25 IST2020-05-08T12:25:52+5:302020-05-08T12:25:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील मोहिदा शिवारातील वसतिगृहातील क्वारंटाईन कक्षामध्ये कोरोना विषाणू संशयित नागरिकांच्या स्वॅबचे नमुने घेण्याची सुविधा ...

Begin to take swabs in the center of the chest | शहाद्यातील केंद्रात स्वॅब घेण्यास सुरुवात

शहाद्यातील केंद्रात स्वॅब घेण्यास सुरुवात


लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील मोहिदा शिवारातील वसतिगृहातील क्वारंटाईन कक्षामध्ये कोरोना विषाणू संशयित नागरिकांच्या स्वॅबचे नमुने घेण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी सहा संशयितांचे नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिली.
शहरात २१ एप्रिलला कोरोना विषाणू संक्रमित पहिला रुग्ण आढळल्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत ही संख्या नऊपर्यंत पोहोचली होती. बाधित रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांसह अतिसंपर्कातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून संशयित आढळल्यास त्यांच्या स्वॅबचे नमुने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात घेतले जात होते. यासाठी प्रशासनाला संशयीताचे घर ते नंदुरबार जिल्हा रुग्णालय व पुन्हा परत शहादा असा रुग्णवाहिकेद्वारे प्रवास करावा लागत होता. त्यातच बऱ्याचवेळा रुग्णवाहिका वेळेवर उपस्थित होत नसल्याने संपूर्ण प्रशासनाला संशयित नागरिकाच्या घराजवळ परिसरातच थांबावे लागत होते.
२१ ते २८ एप्रिल दरम्यान कोरोना विषाणू संक्रमित रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांनी शहादा येथे संशयितांचे स्वॅबचे नमुने घेण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केल्यानंतर शहरातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना याबाबत नंदुरबार येथे प्रशिक्षण दिले. कर्मचाºयांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी मोहिदा शिवारातील वसतिगृह येथे असलेल्या क्वारंटाईन कक्षात सहा संशयितांचे नमुने घेण्यात आले. शहादा येथे ही सुविधा उपलब्ध झाल्याने प्रशासनाचा बराच वेळ यामुळे वाचणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांनी सांगितले.


 

Web Title: Begin to take swabs in the center of the chest