शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळात दारु विक्री केल्याप्रकरणी बियरबारचा परवाना रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 21:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील कोरीट नाका परिसरातील बियर बार सुरु ठेवून मद्यविक्री करणाऱ्यावर बारमालकावर एलसीबीच्या पथकाने शनिवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील कोरीट नाका परिसरातील बियर बार सुरु ठेवून मद्यविक्री करणाऱ्यावर बारमालकावर एलसीबीच्या पथकाने शनिवारी कारवाई केली होती़ या कारवाईनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने या बियरबारचा परवाना रद्द करण्याची कारवाई सोमवारी केली़कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित आहे़ असे असतानाही शहरातील कोरीट नाका परिसरात गजराज बियरबारमध्ये मद्यविक्री सुरु असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती़ त्यानुसार शनिवारी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या पथकाने येथे पाहणी करुन माहिती घेत डमी ग्राहक पाठवून मद्याची मागणी केली होती़ हॉटेलच्या मागील बाजूने मद्याची विक्री सुरु असल्याची खात्री झाल्यावर एलसीबीचे पोलीस निरीक्षक नवले यांच्यासह पथकाने येथे छापा टाकला होता़ यावेळी तिघे मद्य प्राशन करत होते़ त्यांनी पोलीस पथकाला पाहून पळ काढला होता़ दरम्यान काउंटरवर थांबलेल्या मनोज हिरालाल चौधरी रा़जयचंद नगर याला ताब्यात घेतले असता त्याने चोरटी विक्री केल्याची कबुली दिली आहे़ त्याला पथकाने ताब्यात घेतले घेत त्याच्याकडून ३ लाख २ हजार ३०५ रुपयांचे देशी विदेशी मद्य, बियरच्या बाटल्या मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे़ याबाबत हॉटेलमालक दिलीप हिरालाल चौधरी व मनोज हिरालाल चौधरी या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई पथकातील पोलीस निरीक्षक नवले, पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत यांच्यासह पथकाने केली़दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाचे परवाना रद्द केला आहे़ अधीक्षक युवराज राठोड, दुय्यम निरीक्षक शैलेंद्र मराठे, जवान हितेश जेठे, वाघ यांनी कारवाई केली़