किरकोळ वादातून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 12:25 IST2019-12-15T12:25:31+5:302019-12-15T12:25:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतात शेळ्या चरत आहेत असे सांगितल्याचा राग येऊन चौघांनी एकास घरात घुसून मारहाण केली़ ...

 Beating through a minor dispute | किरकोळ वादातून मारहाण

किरकोळ वादातून मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतात शेळ्या चरत आहेत असे सांगितल्याचा राग येऊन चौघांनी एकास घरात घुसून मारहाण केली़ सुलवाडे ता़ शहादा येथे शुक्रवारी दुपारी २ वाजता ही घटना घडली़
सुलवाडे येथील रोहिदास ब्रिजलाल पाटील यांनी विष्णू दरबार पाडवी यास शेतात शेळ्या चरत असल्याचे सांगितले होते़ याचा राग आल्याने विष्णू दरबार पाडवी, गोपाल जाधव, तुळशिराम रुपसिंग, अनिल ब्रिजलाल सर्व रा़ सुलवाडे यांनी रोहिदास पाटील यास मारहाण केली़ यादरम्यान विष्णू याने कोयत्याने वार करुन रोहिदास पाटील यांना जखमी केले़ दरम्यान इतर तिघांनी घरावर दगड विटा मारुन तसेच मोटारसायकलीचे नुकसानही केले़ याबाबत म्हसावद पोलीस ठाण्यात दोघांकडून परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली आहे़ रोहिदास पाटील यांच्या फिर्यादीवरुन चौघे तर विष्णू पाडवी याच्या फिर्यादीवरुन रोहिदास पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे़

Web Title:  Beating through a minor dispute