दारू पाजल्याचा जाब विचारल्यावरून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:09 IST2020-03-16T12:09:30+5:302020-03-16T12:09:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पतीस दारू पाजल्याचा जाब विचारल्याचा राग येवून महिलेस, तिच्या मुलास आणि सुनेस बेदम मारहाण ...

Beating up after being asked to drink alcohol | दारू पाजल्याचा जाब विचारल्यावरून मारहाण

दारू पाजल्याचा जाब विचारल्यावरून मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पतीस दारू पाजल्याचा जाब विचारल्याचा राग येवून महिलेस, तिच्या मुलास आणि सुनेस बेदम मारहाण केल्याची घटना कोपर्ली, ता.नंदुरबार येथे घडली. याबाबत चार जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपर्ली येथील लताबाई हरिश्चंद्र अहिरे यांच्या पतीला लक्ष्मण नारायण अहिरे यांनी दारू पाजल्याचा आरोप लताबाई यांनी केला. त्याचा जाब त्यांनी विचारला असता त्याचा राग लक्ष्मण अहिरे व त्यांच्या परिवाराला आला. त्या वादातून लक्ष्मण नारायण अहिरे, मनिषा लक्ष्मण अहिरे, सनी रवींद्र सूर्यवंशी सुमित रवींद्र सूर्यवंशी यांनी एकत्र येत वाद घातला. लताबाई यांच्या मुलास मारहाण केली. तेथे लताबाई व त्याची सून गेली असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली. शिविगाळ करीत ठार मारण्याची देखील धमकी दिली. या मारहाणीत तिघांना मार लागला.
याबाबत लताबाई अहिरे यांनी कोपर्ली दूरक्षेत्र गाठून तक्रार दिली. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात लक्ष्मण नारायण अहिरे, मनिषा लक्ष्मण अहिरे, सनी सूर्यवंशी व सुमित सूर्यवंशी यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक राजेंद्र शिंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वसावे करीत आहे.
दरम्यान, पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Web Title: Beating up after being asked to drink alcohol