शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

समाजाचा विकास व कल्याणासाठी व्यसनमुक्त व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी समाज हा मुळातच धार्मिक प्रवृत्तीचा आहे. समाजात आजही अनिष्ट रूढी, परंपरा असून त्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी समाज हा मुळातच धार्मिक प्रवृत्तीचा आहे. समाजात आजही अनिष्ट रूढी, परंपरा असून त्यांना नष्ट करण्याची गरज आहे. मानवाचे कल्याण व समाजाचा विकास करायचा  असेल तर आधी  व्यसनमुक्त व्हा, असे आवाहन संत महात्म्यांनी केले. सोमवारी पहाटे चार वाजता यज्ञ महोत्सवाचा समारोप करण्यात  आला.नंदुरबार तालुक्यातील कोठली येथे भातिजी संप्रदायाच्या वतीने रविवारी नवकुळ नाग पूजा नाम यज्ञ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशातून आलेल्या विविध संतांनी भाविकांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर खासदार डॉ हीना गावीत, अजबसिंग महाराज, शामसिंग महाराज, दिलीप महाराज, रतिलाल महाराज, जयसिंग महाराज, जंबूभाई महाराज, सेवादास महाराज, खुमानसिंग महाराज, कुवरसिंग महाराज, आत्माराम महाराज, नारसिंग महाराज, सोमाभाई महाराज, रुमशीभाई महाराज, शिवाजी महाराज, अनितामाता, सरपंच वासंतीबाई वळवी आदी उपस्थित होते.या वेळी खासदार डॉ.हीना गावीत म्हणाल्या की, परिसरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम होत असल्याने येथील भूमी पवित्र झाली आहे. प्रत्येक व्यक्तीला भक्तीच्या माध्यमातून दिशा मिळते. भातिजी महाराज संप्रदाय आदिवासी समाजासाठी व्यसनमुक्तीचे कार्य करीत आहे. व्यसनमुक्त ही काळाची गरज असून व्यसनामुळे आरोग्यासह सामाजिक जीवनही धोक्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रताप वसावे महाराज म्हणाले की, भातिजी महाराज संप्रदाय समाजातील अंधश्रद्धा, जुन्या रुढी-परंपरा व व्यसनमुक्तीचे कार्य करीत आहे. सुसंस्कृत समाजासाठी सर्वानी एकत्र येणे आता गरजेचे झालेले आहे. पशू हत्या, मांसाहार, व्यसनाधीनता यांच्यापासून मानवाने दूर राहायला हवे. शरीर पवित्र होण्यासाठी मन पवित्र होणे गरजेचे आहे. भागवताचार्य जिज्ञासादीदी म्हणाल्या की, युवकांनी भक्तीच्या मार्गाकडे वळावे. भक्तीतच सर्वात मोठी शक्ती सामावल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आदिवासी, गुजराती, हिंदी व मराठी भाषेत अनेक उदाहरणे देऊन व्यसनमुक्तीचा संदेश दिला.कार्यक्रमात गुजरातमधील डेडीयापाडा येथील भजनी मंडळाच्या पथकाने सुमधूर भक्तीगीतांचे सादरीकरण केले. मध्यरात्री भातिजी महाराजांची सामूहिक आरती करण्यात आली. रात्रभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. पहाटे चार वाजता भातिजी महाराजांचा जयघोष करून यज्ञ महोत्सवाची सांगता करण्यात आली.