शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार शहरातील एटीएममध्ये ठणठणाट

By admin | Updated: May 24, 2017 11:29 IST

नंदुरबारमधील ग्राहकांचे हाल सुरुच. रिझर्व बँकेकडून चलन पुरवठा होत नसल्याने समस्या

ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.24- रिझर्व बँकेकडून चलनाचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने सध्या नंदुरबार शहरातील सर्वच एटीएममध्ये ठणठणाट असल्याची स्थिती आह़े त्यामुळे इतर ब्रँचमधून पैसे आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल़े  दोन ते चार दिवस शहरातील एटीएममध्ये पैशांची चणचण भासणार असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सांगण्यात आले आह़े 
गेल्या काही दिवसांपासून शहरातील एटीएम पैशांअभावी बंद आहेत़ शहरातील सर्वच एटीएममध्ये पैशांची चणचण असून काही ठिकाणी मात्र जसा पैसा उपलब्ध होत आहे तसे एटीएम सुरु करण्यात येत आह़े त्यामुळे आधिच पैसे कमी असल्याने नागरिकांना केवळ 500, हजार रुपयांर्पयतच पैसे एटीएममधून काढता येत आह़े बहुतेक ठिकाणी केवळ 500 व हजारच्या नोटा असून 2 हजारच्या नोटांचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आल़े 
दुस:या शाखेतून चलन पुरवठा
रिझर्व बँकेकडूनच पुरेशा चलनाचा पुरवठा होत नसल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक दिवाकर वाणी यांनी लोकमतशी बोलताना सांगितल़े स्टेट बँक ऑफ इंडिया शहरातील 14 एटीएमना चलन पुरवठा करीत असल्याने मुख्य शाखेतच पुरेसा पैसा नसल्याने चलन टंचाई जाणवत असल्याचेही त्यांनी  सांगितल़े दरम्यान, येत्या काही दिवसात लगतच्या शाखेतून पैसे आणण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितल़े येत्या दोन ते चार दिवसात ग्राहकांना पुरेसे पैसे उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितल़े