जिल्ह्याबाहेरील नागरिकांना नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST2021-05-19T04:31:48+5:302021-05-19T04:31:48+5:30

नंदुरबार जिल्हा आदिवासीबहुल व दुर्गम जिल्हा आहे. बाहेरील नागरिक येथे लसीकरणासाठी येत असल्याने लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गर्दी होत आहे. ...

Ban on vaccination of citizens from outside the district in Nandurbar district | जिल्ह्याबाहेरील नागरिकांना नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणास बंदी

जिल्ह्याबाहेरील नागरिकांना नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणास बंदी

नंदुरबार जिल्हा आदिवासीबहुल व दुर्गम जिल्हा आहे. बाहेरील नागरिक येथे लसीकरणासाठी येत असल्याने लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गर्दी होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासोबत कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लसीकरणासाठी मर्यादित प्रमाणात प्राप्त डोस विचारात घेता स्थानिक नागरिक लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. आंतरजिल्हा बंदी असल्याने अन्य राज्य किंवा जिल्ह्यातून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांच्या पासेसची पडताळणी करण्यात यावी. जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये. अन्य जिल्ह्यातील नागरिक लसीकरणासाठी आल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना त्यांच्या जिल्ह्यात लसीकरण करून घेण्याबाबत कळविण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

Web Title: Ban on vaccination of citizens from outside the district in Nandurbar district