शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय समितीची नंदुरबार जिल्ह्याकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सहा हजार हेक्टरपेक्षा अधीक पिकांचे नुकसान झाले असतांनाही नुकसानीची पहाणी करण्यासाठी राज्यात आलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सहा हजार हेक्टरपेक्षा अधीक पिकांचे नुकसान झाले असतांनाही नुकसानीची पहाणी करण्यासाठी राज्यात आलेल्या केंद्रीय समितीने जिल्ह्याकडे पाठ फिरविली आहे. शेजारच्या धुळे, नाशिक व जळगाव जिल्ह्यात पथकाने भेटी दिल्या आहेत. राजकीय नेते आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच केंद्रीय समिती जिल्ह्यात येवू शकली नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नुकसानीच्या पंचनाम्यापासून अनेक गावे व शेतकरी सुटले असल्याची ओरड आजही कायम आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील शेतीचे नुकसान झाले होते. शेतक:यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. वेळेवर आणि पुर्ण पंचनामे करावे अशी मागणी शेतक:यांनी लावून धरल्यावर 33 टक्केपेक्षा अधीक नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले. त्यात सहा हजार हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्र बाधीत झाल्याचा अहवाल  प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार 30 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली होती.केंद्रीय समिती राज्यात नुकसानग्रस्त भागाची पहाणी करून केंद्र सरकारला अहवाल देण्यासाठी केंद्राची समिती राज्यात दाखल झाली आहे. समितीचे एक पथक उत्तर महाराष्ट्रातील नुकसानीची पहाणी करीत आहे. शुक्रवार आणि शनिवारी ही समिती पहाणी करणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यात या समितीच्या पथकाने पहाणी केली. परंतु समितीच्या दौ:यात नंदुरबार जिल्हा वगळण्यात आला आहे. जिल्ह्यातील नुकसानीची टक्केवारी ही अत्यल्प असल्यामुळे नियोजनानुसार जिल्हा वगळण्यात आल्याचे स्पष्टीकरण  प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. असे होते नुकसान नंदुरबार तालुक्यात एकूण 55़57 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आह़े यातून 78 शेतक:यांना 5 लाख रुपयांची मदत प्रस्तावित आह़े कोरड क्षेत्रात 52 तर फळपीक धारक 27 शेतक:यांचा समावेश आह़े नवापुर तालुक्यात 1 हजार 593 शेतक:यांच्या 506़25 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आह़े यासाठी 34़58 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आह़े 1 हजार 589 शेतकरी हे कोरडवाहू क्षेत्रधारक तर 4 शेतकरी फळपिकधारक आहेत़ अक्कलकुवा तालुक्यात तब्बल 1 हजार 869 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आह़े 3 हजार 965 शेतक:यांना अवकाळीचा फटका बसल्याने त्यांना 1 कोटी 27 लाख 28 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यात आली आह़े शहादा तालुक्यात 2 हजार 68 शेतक:यांच्या 1 हजार 576 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आह़े या शेतक:यांसाठी 1 कोटी 4 लाख रुपयांची मदत प्रस्तावित करण्यात आली आह़े तालुक्यात 2 हजार 58 कोरडवाहू शेतक:यांचे नुकसान झाले आह़े धडगाव तालुक्यात 3 हजार 173 शेतक:यांना अवकाळीचा फटका बसला आह़े यातून 1 हजार 857 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आह़े या शेतक:यांसाठी 1 कोटी 26 लाख 36 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आह़े तळोदा तालुक्यात 8 शेतक:यांच्या 4 हेक्टरचे नुकसान झाले आह़े शेतक:यांमध्ये नाराजी पथकाने जिल्ह्यात नुकसानीची पहाणी करणे टाळल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक भागातील शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. फळ पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. केंद्रीय समिती जिल्ह्यात आली असती तर शेतक:यांना तेव्हढा दिलासा मिळाला असता. परंतु समितीनेही त्याकडे पाठ फिरविली. मदत सरसकट राहणार केंद्रीय समितीच्या दौ:यानंतर जो अहवाल दिला जाईल त्यानुसार राज्याला सरसकट मदत दिली जाणार आहे. त्यामुळे एका जिल्ह्यावर    अन्याय व दुस:या जिल्ह्याला झुकते माफ असला प्रकार राहणार नाही.