शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात लसीकरणाबाबत आराेग्य विभागाकडून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात कोविड लसीकरणाबाबत नागरिकांत निर्माण झालेल्या गैरसमजुतीमुळे भीतीचे वातावरण असून, अफवा पसरल्याने बहुतेक नागरिक स्वत:हून लसीकरण ...

तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात कोविड लसीकरणाबाबत नागरिकांत निर्माण झालेल्या गैरसमजुतीमुळे भीतीचे वातावरण असून, अफवा पसरल्याने बहुतेक नागरिक स्वत:हून लसीकरण करून घेण्यास तयार होत नसल्याची परिस्थिती आहे.

गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत ग्रामीण भाग म्हणावा तेवढा प्रभावित झाला नव्हता. त्यामुळे बहुतेक ग्रामीण आदिवासी समाजात वेगळीच समजूत उदयास आली. मात्र यंदा आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त प्रमाणात शिरकाव झाल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ग्रामीण भागात कोविडची लागण झालेल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे योग्य उपचार व मार्गदर्शनाअभावी मृत्यूचे प्रमाणदेखील वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी वेळीच योग्य उपचार व्हावा यासाठी आरोग्य विभागातील डाॅक्टर, कर्मचारी खेडोपाडी भेटी देत लसीकरणासाठी जनजागृती करीत आहेत. मात्र बहुतेक नागरिकांच्या विरोधाचा सामना करून डाॅक्टर व कर्मचारी आपली सेवा बजावताना दिसत आहेत.

सोमावल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे काही दिवसांपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने बुधवारी माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी सपत्निक लसीकरण करून घेतले. या वेळी त्यांनी आदिवासी बोलीभाषेत लसीकरणासाठी आवाहन केले.

या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, सोमावल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर ठाकरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. हर्षदा चौधरी, आरोग्य सुपरवायझर एस.ए. ठाकरे, आर.डी. आगळे, लॅब सुप्रिटेंड असिस्टंट के.एस. कुवर, आरोग्य साहाय्यिका ए.व्ही. कुवर, आरोग्य सेवक व्ही.जे. सुसर, आरोग्य सेविका ए.एस. करमकर, पी.ए. वळवी, जयश्री वसावे, परिचर दत्तू बोरसे, मनीषा साळवेसह गौरव वाणी आदी उपस्थित होते.