शहादा बी.फार्मसी महाविद्यालयात कोरोनाबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:37 IST2021-02-17T04:37:36+5:302021-02-17T04:37:36+5:30

यावेळी सर्वप्रथम आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सॅनिटायझेशन करून त्यांना महाविद्यालयाच्या परिसरात प्रवेश देण्यात आला. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी तोंडाला ...

Awareness about Corona in Shahada B. Pharmacy College | शहादा बी.फार्मसी महाविद्यालयात कोरोनाबाबत जनजागृती

शहादा बी.फार्मसी महाविद्यालयात कोरोनाबाबत जनजागृती

यावेळी सर्वप्रथम आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सॅनिटायझेशन करून त्यांना महाविद्यालयाच्या परिसरात प्रवेश देण्यात आला. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी तोंडाला मास्क तसेच सर्वांनी सामाजिक अंतराचे पालन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. एस. पी. पवार यांनी महाविद्यालयाविषयी माहिती देऊन कोरोनाविषयी शासनाने दिलेल्या नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन करुन विद्यार्थ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. सध्या महाविद्यालयात फक्त प्रात्यक्षिक करण्यासाठी विद्यार्थ्यांना यावे लागणार आहे व त्यांचे वर्ग हे ऑनलाईन पद्धतीनेच सुरू राहणार आहेत. महाविद्यालय सुरू होताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, पी.आर. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी. पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Web Title: Awareness about Corona in Shahada B. Pharmacy College