दुर्गम भागात कोरोना व लसीकरणाबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST2021-05-18T04:31:25+5:302021-05-18T04:31:25+5:30

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यावर आळा घालण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे म्हणून आपल्या ...

Awareness about corona and vaccination in remote areas | दुर्गम भागात कोरोना व लसीकरणाबाबत जनजागृती

दुर्गम भागात कोरोना व लसीकरणाबाबत जनजागृती

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यावर आळा घालण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे म्हणून आपल्या गावातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामपंचायतीमध्ये जाऊन खात्री करून लसीकरण करून प्रशासनास सहकार्य करावे, कोरोना झाला तरीही हा सौम्य प्रमाणाचा असेल, हे लक्षात घेऊन आशा कार्यकर्ती, आरोग्य सेविका, शिक्षक, सरपंच व आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क करून लसीकरणाची नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

या उपक्रमासाठी उपविभागीय अधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मणिलाल शेल्टे यांनी हिरवा मोहिमेला परवानगी दिली आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सिनी संस्थेचे विभागीय समन्वयक साजिद मन्सुरी, सतीश एखंडे, दीपक शर्मा, डॉ. सुमीत देवरे, नंदलाल पाटील, किशोर जाधव, सुधीर ठाकरे व त्याचे सहकारी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Awareness about corona and vaccination in remote areas