तरुणाईच्या ‘जाणीवांचा’ जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 12:21 PM2020-01-17T12:21:55+5:302020-01-17T12:22:16+5:30

शहादा : शेतकरी आत्महत्या, बहिणाबाइंर्ची गाणी, अवयवदान, समलिंगीचा स्वीकार, देहदान, नारी शक्ती, व्यसनमुक्ती, आजचा वारकरी, रस्ता सुरक्षा, पर्यावरण, सर्जिकल स्ट्राईक, छत्रपती शिवाजी महाराज, गड-किल्ले संवर्धन, छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक, असे असंख्य विषय आणि देखावे, फलक याद्वारे हाताळत तरुणाईने अवघ्या शहादेकरांचे मन जिंकत युवारंग युवा महोत्सवातील गुरूवारी पहिला दिवस गाजवला. दरम्यान, दुसरीकडे पथसंचलनात चोपडा येथील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या संघाने शेतकरी आत्महत्यावर सादर केलेल्या सजीव देखावा पाहून उपस्थित नागरिकांचे डोळे पाणावले होते़ धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या संघांनी पथनाट्यांसह सांस्कृतिक रंगांचे दर्शन घडवत युवारंगाचा शानदार असा शुभारंभ केला़ प्रारंभी कृषी भवनाजवळ मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून या सांस्कृतिक रॅलीचे उद्घाटन करण्यात आले़

The awakening of the 'senses' of youth | तरुणाईच्या ‘जाणीवांचा’ जागर

तरुणाईच्या ‘जाणीवांचा’ जागर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारपासून शहादा येथे विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाला प्रारंभ झाला. जळगाव,धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील संघांचे सकाळी ८ वाजेपासून आगमन महाविद्यालयाच्या प्रागंणात सुरु झाले होते़ दुपारपर्यंत दीड हजाराच्यावर अधिक विद्यार्थी महाविद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाले होते़
युवारंग महात्सवाच्या पथसंचलनाला गुरूवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास महात्मा फुले चौकातून प्रारंभ झाला. पथसंचालनाला पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविली. याप्रसंगी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, युवारंग कार्याध्यक्ष दीपक पाटील, प्रा.नितीन बारी, प्राचार्या लता मोरे, सहसंचालक सतीष देशपांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ.सत्यजित साळवे, अधिसभा सदस्य अमोल मराठे, दिनेश नाईक, दिनेश खरात, नितिन ठाकूर आदी उपस्थित होते.
शहाद्याच्या महात्मा फुले चौकातील कृषीभवनपासून पथसंचलनाला सुरुवात झाली. बसस्थानक, नगरपालिका चौक, खेतीया रोड, येथून पथसंचलन जात असताना रस्त्याच्या दूतर्फा तरुण, तरुणी अबाल व वृध्दांनी प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान, शिवछत्रपती ग्रुप, संकल्प ग्रुपच्यावतीने पालिका चौकात व जमीअत उलेमाच्यावतीने शोभायात्रेत सहभागी झालेल्या कलावंतांचे शीतपेय देऊन स्वागत करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता या पथसंचलनाची सांगता झाली.


विद्यार्थ्यांचा सेल्फी आनंंद

४एस़एच़ कॉलेज धरणगावच्या संघाने महात्मा गांधी यांच्या विचारांची दांडी यात्रा काढली होती़ त्यात जहा पवित्रता वही निर्भयता, असे घोषवाक्य असलेले फलक विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते़ तसेच विद्याथ्यार्ने हुबेहुबे महात्मा गांधी यांची वेशभूषा साकारली होती़
४पथसंचलन संपल्यानंतर सर्व विद्यार्थी महाविद्यालयात परतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या ग्रुपसोबत महाविद्यालय परिसरात फोटोसेशन केले़ यावेळी अनेकांना आपला सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही़ दरम्यान, युवारंगातील क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सेल्फी पॉर्इंटवर गर्दी केलेली होती़
४शुक्रवारी युवारंग महोत्सवाचे उद्घाटन होणार असून या दिवसापासूनच कलाप्रकारांना सुरूवात होणार आहे़ त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या गुरूवारी सायंकाळी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये रंगीत तालिम रंगल्या होत्या़ तर काही विद्यार्थ्यांनी कॅम्पस फिरण्याचा आनंद घेतला़ दुसरीकडे रंगमंचांकडून विद्यार्थ्यांनी सादरीकरणावर चर्चा होवून मैफेल रंगली होती़
४दरम्यान जळगावच्या मुजे महाविद्यालयाने सर्वधर्म समभाव, शहादा तालुका एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाने शिवाजी महाराज यांचा सजीव देखावा शेंदूर्णी येथील गरुड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया मायाजाल, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे तरुण पिढीची होणारी वाताहत तर शहादातील इन्स्टीट्युट आॅफ मॅनेजमेंट रिसर्च डेव्हलपमेंट महाविद्यालयाच्या संघाचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा सजीव देखावा देखील लक्ष वेधून घेत होता़ यात घोड्यांवर स्वार विद्यार्थिनींचा समावेश होता़


४युवारंग युवक महोत्सवाचे पथसंचलन पूर्ण झाल्यानंतर युवा वर्ग विश्रांती घेईल अशी शक्यता होती़ परंतू गोमाई काठावरील महाविद्यालयाच्या आवारात आनंद घेत त्यांनी कलेची मैफल सजवली होती़ विद्यार्थ्यांच्या या उत्साहामुळे हा परिसर सायंकाळी यात्रा भरल्यासारखा जाणवत होता़ जेवणात मिष्ठान्न भोजन केल्यानंतर युवा वर्गाने आपआपल्या इव्हेेंट बाबत चर्चा करुन तयारीही करुन घेतली़ यामुळे कुठे गायकीच्या रियाजचे सूर तर तबल्याचा ताल यामुळे परिसरात चैतन्य संचारले होते़ रात्री आठ वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनी आपआपल्या निवासावर पोहोचले होते़याठिकाणी उद्याची तयारी हाच मुख्य अजेंडा असल्याचे दिसून आले़
४युवारंग युवक महोत्सवाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीला पाहण्यासाठी शहादा शहरात महिला आणि आबालवृद्धांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती़ स्थानिक विद्यार्थी कलावंतांच्या ओळखीचे तसेच त्यांचे कुटूंबियही यात सहभागी होते़ शहाद्यातील नाईक महाविद्यालय, विकास सिनीयर कॉलेज, साने गुरुजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात त्यांचे कुटूंबिय पुढे होते़ दरम्यान बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांनाही नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली़ चोपडा महाविद्यालयाच्या पथकाने चौकाचौकात सादर केलेले पथनाट्य पाहण्यासाठी इतर संघातील स्पर्धक विद्यार्थीही येत होते़ सोबतच शहरातील नागरिकांनी या पथनाट्याला दाद दिली़ यात महिलांचा मोठा सहभाग होता़ शहरात निघालेल्या या पथसंचलानात अडचणी येऊ नयेत यासाठी वाहतूक काही काळासाठी वळवण्यात आली होती़ लोणखेडा येथील गोमाई नदीच्या दोन पैकी एकाच पुलावरुन धडगाव व मध्यप्रदेशात जाणारी वाहने वाहतूक शाखेकडून सोडली जात होती़
४शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासून स्पर्धा सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांना आयोजक महाविद्यालयाकडून काटेकोर सूचना करण्यात येत होत्या़ मिमिक्रीनंतर सर्वच विद्यार्थ्यांना मुख्य रंगमंच क्रमांक एक थांबायचे सूचित केले गेले आहे़


कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ५० महाविद्यालयाच्या संघानी पथ संचलनात सहभाग घेतला होता. यात प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मता, रस्तासुरक्षा अभियान, पर्यावरण, व्यसनानिधनतेचे परिणाम, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, सोशल मिडियाच्या आहारी गेलेली पिढी, कॅन्सरला आळा, राष्ट्रीय साक्षरता आदींद्वारे जनजागृतीचा संदेश नागरिर्कांपर्यंत विद्यार्थ्यांनी पोहोचविला.

Web Title: The awakening of the 'senses' of youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.