बस अपघातात मृत्यू झालेल्या चालकाच्या कुटुंबीयांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 12:10 PM2019-09-04T12:10:43+5:302019-09-04T12:10:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : औरंगाबाद-शहादा बसला झालेल्या अपघातात ठार झालेले एस.टी. चालक मुकेश नगीन पाटील यांच्या कुटुंबीयांना शहादा ...

Assistance to the family of the driver who died in a bus accident | बस अपघातात मृत्यू झालेल्या चालकाच्या कुटुंबीयांना मदत

बस अपघातात मृत्यू झालेल्या चालकाच्या कुटुंबीयांना मदत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : औरंगाबाद-शहादा बसला झालेल्या अपघातात ठार झालेले एस.टी. चालक मुकेश नगीन पाटील यांच्या कुटुंबीयांना शहादा आगारातील कर्मचा:यांनी  एक लाख रुपये मदतनिधी गोळा करून पाटील यांच्या मुलाच्या नावाने मुदतठेव पावती आगार प्रमुख योगेश लिंगायत यांच्या हस्ते देण्यात आली.
18 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद-शहादा या बसला शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ गावाजवळ अपघात झाला होता. या अपघातात बसचे चालक मुकेश नगीन पाटील (36) यांच्यासह 12 जणांचा मृत्यृ झाला होता. दोंडाईचाकडे भरधाव वेगात         जाणा:या  कंटेनर व एस.टी. बसची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला होता. बसचालक मुकेश पाटील यांच्या मृत्युमुळे घरातील              कर्ता माणूस गेल्याने पत्नी व लहान मुलगा व मुलगी उघडय़ावर आले आहेत. शहादा आगार प्रमुख योगेश लिंगायत यांनी आगारातील अभियांत्रिकी, चालक-वाहक, सफाई कामगार यांना मदतनिधी देण्याचे आवाहन केले. त्यानुसार एक लाख रुपये सहायता निधी गोळा  झाल्यानंतर त्याची मुदतठेव पावती चालक पाटील यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केली.
 

Web Title: Assistance to the family of the driver who died in a bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.