शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा आजपासून गजबजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आश्रमशाळांमधील पाचवी ते आठवीच्या वर्गाची घंटा सोमवारपासून वाजणार आहे. त्यासाठी जिल्ह्यतील १३९ आश्रमशाळा सज्ज ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आश्रमशाळांमधील पाचवी ते आठवीच्या वर्गाची घंटा सोमवारपासून वाजणार आहे. त्यासाठी जिल्ह्यतील १३९ आश्रमशाळा सज्ज झाल्या आहेत. काही आश्रम शाळांमध्ये विद्यार्थी दाखल झाले असून काही ठिकाणी विद्यार्थी आणण्यासाठी शिक्षकांना गावोगावी फिरावे लागत आहे. पालकांची संमतीपत्र देखील घेतले जात आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे देखील मोठे आव्हान राहणार आहे.  आश्रम शाळांमधील नववी ते बारावीचे वर्ग डिसेंबर महिन्यात सुरू झाले. सुरुवातीच्या काळात विद्यार्थी संख्या जेमतेम होती. नंतरच्या काळात ती वाढली, परंतु अद्यापही ती ६० टक्केच्या वर पोहचू शकली नाही. त्यामुळे पाचवी ते आठवीच्या वर्गातील उपस्थितीला कसा आणि काय प्रतिसाद राहील याकडे आता लक्ष लागून आहे. तब्बल २२ हजार विद्यार्थीजिल्ह्यात नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालय आहेत. दोन्ही प्रकल्प कार्यालये मिळून एकुण १३९ आश्रमशाळा चालविल्या जातात. याशिवाय निवासी इंग्रजी शाळांचाही समावेश आहे. या सर्व शाळांमध्ये जवळपास २२ हजारापेक्षा अधीक विद्यार्थी आहेत. नंदुरबार प्रकल्प कार्यालयाअंतर्गत शासकीय आश्रम शाळांमधील  पाच हजार ८२३ तर अनुदानीत आश्रम शाळांमधील सहा हजार ७८६ विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीदाखल होणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचेे निश्चीत करण्यात आले आहे. त्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी, जवळचे उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामिण रुग्णालयाशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व आरटीपीसीआर कोविड चाचणी करण्याचे निर्देश आधीच देण्यात आले आहेत. आणण्याची कसरतविद्यार्थ्यांना आश्रम शाळेत आणण्याची मोठी कसरत राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना राजी करण्यात येत आहे. यासाठी गेल्या आठवडाभरापासून शिक्षक या मोहिमेवर लागले होते. पालकांकडून संमतीपत्र देखील भरून घेतले जात आहे. आहार देणारविद्यार्थ्यांना आहार शाळेतच पुरविण्यात येणार आहे. सेंट्रल किचनचा उपयोग केला जाणार आहे. काही ठिकाणी शाळांना स्थानिक ठिकाणी शिधा घेण्याचे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य खरेदीसाठी त्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे रक्कम अदा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात दोन प्रकल्प कार्यालय आहे. या दोन्ही कार्यालय मिळून एकुण १३९ आश्रमशाळा आहेत. त्यात ७४ शासकीय तर ६५ अनुदानीत आश्रम शाळांचा समावेश आहे. याशिवाय ४७ वसतिगृहे आहेत. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा विचार करता एकुण साडेआठ हजार विद्यार्थी आहेत. त्यांना दाखल करून घेण्याची कसरत राहणार आहे.  

काय काळजी घेणार?अधीग्रहीत होत्या त्या व बंद असलेल्या वसतिगृहे आणि आश्रमशाळा इमारतींचे संपुर्ण सॅनिटाईझेशन करण्यात आले असून स्वच्छता करण्यात आली आहे. 

पाचवी ते आठवीच्या निवासी विद्यार्थ्यांना आणून त्यांची आरोग्य तपासणी करणार. पालकांकडून हमीपत्र भरून घेणार व आवश्यक काळजी घेणार. 

शिक्षकांचीही आरोग्य तपासणी करणार. त्यासाठी आरोग्य विभागाची मदत घेणार. विद्यार्थ्यांच्या कोविड चाचणीसाठी पालकांना विश्वासात घेण्यात येत असून आरोग्यदृष्टया आवश्यक असल्याचे पटवून दिले जात आहे. 

आहारासाठी सेंट्रलकिचनचा उपयोग करण्यात येणार आहे. शिवाय स्थानिक ठिकाणी शिधा खरेदीसाठी देखील परवाणगी देण्यात आली आहे. 

जिल्ह्यात कोरोना काळात दोन आश्रमशाळा व तीन वसतीगृहांच्या इमारती कोरोनासाठी आरक्षीत करण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात त्या खाली करण्यात आल्या.