शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रेमडीसिवर इंजेक्शनची कृत्रिम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST

गेल्या महिनाभरापासून शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. परिणामी या बाधितांवर उपचार करणाऱ्या शासकीय रुग्णालयांसह सर्व ...

गेल्या महिनाभरापासून शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. परिणामी या बाधितांवर उपचार करणाऱ्या शासकीय रुग्णालयांसह सर्व खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. ग्रामीण भागात खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांकडूनही कोविडच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कोरोना बाधितांवर उपचार करताना प्राधान्याने रेमडीसिवर इंजेक्शनचा वापर सर्रासपणे केला जात आहे. किमान सहा इंजेक्‍शनचा डोस बाधित रुग्णांना दिला जात आहे. मात्र, शहरातील सर्वच मेडिकल स्टोअर्समध्ये हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे.

बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना सहजपणे इंजेक्शन उपलब्ध व्हावे, यासाठी पी. के. अण्णा फाऊंडेशनमार्फत शनिवारी व रविवारी असे दोन दिवस ७७७ रुपयात इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, सोमवारी या इंजेक्‍शनचा पुरवठा अहमदाबाद येथील कंपनीमार्फत झाला नसल्याने फाऊंडेशनमार्फत सोमवारी एकाही इंजेक्शनची विक्री केली गेली नाही. परिणामी या इंजेक्शनच्या प्राप्तीसाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागली. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही इंजेक्शन मिळाले नसल्यामुळे बाधित रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.

इंजेक्शनच्या कृत्रिम टंचाईमुळे बाधित रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले असून वाटेल त्या किमतीत इंजेक्शन घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याचा गैरफायदा काहींनी घेतला असून, तीन ते चार हजार रुपयांपर्यंत एका इंजेक्शनची विक्री काळ्या बाजारात होत आहे. रुग्ण अत्यवस्थ असल्याने वाटेल ती किंमत मोजण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक तयार असल्याने काहींनी रुग्णांच्या नातेवाईकांना लुटण्याचे प्रकार सुरू केले आहेत. विशेष म्हणजे शहरात शासनाच्या परवानगीने चार कोविड उपचार सेंटर कार्यरत आहेत. नियमानुसार तेथे इंजेक्शनचा साठा उपलब्ध हवा. मात्र, या कोविड सेंटरच्या डॉक्टरांमार्फत रुग्णांच्या नातेवाईकांनी बाहेरून इंजेक्शन आणावे, असा अट्टाहास धरला जात असल्याने नातेवाईकांची फरपट सुरू आहे. शासनाने या कोविड सेंटरची तपासणी करावी. त्याचप्रमाणे हे इंजेक्शन सहजरित्या उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी बाधित रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.