शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कॅशिअरच्या प्रामाणिकपणाचे तळोद्यात कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:56 PM

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : हव्यासापोटी अनेक जण खोटे बोलून रेटून नेतात. परंतु समाजात काही प्रामाणिक लोकदेखील आहेत. त्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : हव्यासापोटी अनेक जण खोटे बोलून रेटून नेतात. परंतु समाजात काही प्रामाणिक लोकदेखील आहेत. त्याचे उदाहरण तळोदा येथील बँकेत दिसून आले.याबाबत माहिती अशी की, बँकेत भरणा करण्यासाठी आलेल्या ग्राहकाकडून एक लाख रूपये जास्तीचा भरणा झाला असल्याचे गुरुवारी हिशोब करताना लक्षात आले. ती रक्कम कोणत्या ग्राहकांची आहे याचा तपास करून बँकेच्या रोकड अधिकाऱ्याने ती रक्कम बँक ग्राहकास प्रामाणिकपणे परत केली. भारतीय स्टेट बँकेच्या तळोदा शाखेतील रोकड अधिकाºयाने दाखविल्याने या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होतआहे.७ जुलैला स्टेट बँक आॅफ इंडियाच्या तळोदा शाखेत नीलिमा शिवाजी पावरा आपल्या बँक खात्यात भरणा करण्यासाठी मुलासोबत आल्या होत्या. त्यांच्याकडील हॅण्डबॅगमधील रक्कम त्यांनी खात्यावर भरण्यासाठी पावतीसह काऊंटरवर रोकड अधिकारी असलेले सागर भोंडवे यांच्याकडे दिली. रक्कम मोजण्यासाठी त्यांनी त्यांच्या समोरील काऊंटरवर रक्कम ठेवली. त्यात रक्कमेचा हिशेब करून ग्राहक महिलेला पावती दिली. मात्र सायंकाळी एकूण रकमेचा हिशेब करताना एक लाख रूपयाची रक्कम जास्तीची भरत होती. म्हणून त्यांनी रात्री साडेआठपावेतो हिशेब केला. दुसºया दिवशी संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासणी केले. सीसीटीव्हीत महिला आपल्या बँगेतून रक्कम काढताना दिसली. त्यात त्यांनी बँगेतून जास्तीची रक्कम दिली असावी, अशी शक्यता लक्षात घेऊन त्या ग्राहक महिलेस बँकेत बोलविण्यात आले. त्यात त्यांना भरणा करण्यासाठी दिलेल्या रक्कमे बद्दल विचारणा करून व त्यांचा बँगेतील एकूण रक्कमेचा हिशेब जुळविला. शाखाधिकारी विनोदकुमार शर्मा यांनी संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केली. त्यानंतर ते एक लाख रूपये त्या महिलेचेच असल्याचे सिद्ध झाले. ते त्या महिलेला परत करून त्यांच्या खात्यावर जमा केले. स्टेट बँकेच्या तळोदा शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या प्रामाणिकतेबद्दल कौतुक करण्यात येत आहे.