छत्रपती शिवाजी महाराज जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST2021-03-31T04:30:55+5:302021-03-31T04:30:55+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजता एकत्र येऊन ती साजरी केली जाते. परंतु या ...

Appeal to celebrate Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti with simplicity | छत्रपती शिवाजी महाराज जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजता एकत्र येऊन ती साजरी केली जाते. परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने साजरी करताना मोठ्या प्रमाणात पोवाडे, व्याख्यान, गाणी, नाटक आदींचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात यावी.

दरवर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाइक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. त्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यास परवानगी असेल.

या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

अशा उपक्रमांचे आयोजन करताना कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण,

वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या

नियमांचे पालन करावे. कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग प्रतिबंधक कायदा व फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.

Web Title: Appeal to celebrate Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti with simplicity