शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
6
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
7
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
8
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
9
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
10
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
11
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
12
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
13
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
14
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
15
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
16
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
17
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
18
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
19
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
20
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
Daily Top 2Weekly Top 5

उघड्या चेहऱ्याबाबत एटीएमवरील सुचना बदलण्यास उदासिनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : एटीएमची सेवा घेणाºया बॅँक ग्राहकांसाठी चेहरा उघडा ठेवावा असा नियम करण्यात आले आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : एटीएमची सेवा घेणाºया बॅँक ग्राहकांसाठी चेहरा उघडा ठेवावा असा नियम करण्यात आले आहे. त्यामुळे एटीएम सेंटरवर जाणाºया प्रत्येक ग्राहकाला उघडे ठेवणे अनिवार्य असते. परंतु सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेमार्फत मास्क बांधणे देखील अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे एटीएममधून सेवा घेणारे ग्राहक कोंडीत सापडले आहे. कोरोनामुळे एटीएमवरील सूचना बदलणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे, शिवाय अनेक ग्राहक एटीएमचा वापर करीत असल्याने प्रत्येक सेंटरवर सॅनेटायझर ठेवण्याची मागणीही करण्यात येत आहे.कोरोनोच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर उपाययोजना केल्या जात आहे. रविवारच्या सुटीमुळे एटीएमच्या बाहेर नागरिकांच्या रांगा दिसून येत आहे. परंतु बँकांसह कुठल्याही यंत्रणांकडून गर्दी कमी करण्याच्या उपाययोजनाच करण्यात आल्या नाही. पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जाणाºया ग्राहकांना बटन दाबणे, बोट ठेवणे यातून मशिनला स्पर्श करावाच लागतो. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याच एटीएमवर सॅनिटायझर्सची व्यवस्था करण्यात आली नाही.याउलट एटीएम च्या कक्षात येताना तोंडाला रुमाल, स्कार्प व मास्क लाऊ नये अशा सूचना जशाच्या तशा आजही आहेत. सर्वच ठिकाणी खोकताना, शिंकताना तोंडाला रुमाल लावा अथवा मास्कचा उपयोग करावा अशी जनजागृती होत आहे, असे असतांना एटीएम मशीनच्या बाबतीत विरोधाभास दिसून येत आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी कोरोना पसरण्यापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी बँकाना न योग्य त्या उपाययोजना करण्यास निर्देश द्यावेत, अशी मागणी होत आहे.

संपूर्ण जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. बहुतांश नियमही बदलले. परंतु बॅँकांकडून वेळचे नियम वगळता कुठलाही बदल केला नाही. प्रत्येक सूचना देखील जुन्याच दिसून येत आहे. त्यामुळे बॅँक ग्राहक नाराची सर्वत्र व्यक्त करीत आहे.