शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

अमोनी गट-गण ठरला ‘लकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 12:42 IST

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : पूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आता अध्यक्षपद व पंचायत समितीेचे सभापती आणि ...

वसंत मराठे ।लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : पूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आता अध्यक्षपद व पंचायत समितीेचे सभापती आणि उपसभापती अशा प्रमुख पदांचा मान तालुक्यातील अमोनी गटास योगा-योगाने जुळून आला आहे. साहजिकच हा गट जिल्ह्यात लकी ठरला असून, त्या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.जिल्हा परिषदेच्या तळोदा तालुक्यातील अमोनी गट अतिदुर्गम म्हणून ओळखला जात असतो. कारण या गटास सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गावे-पाड्यांचा समावेश आहे. साहजिकच गटाचे क्षेत्रफळदेखील मोठे आहे. तथापि रोजकीय दृष्ट्या हा गट अतिशय महत्त्वपूर्ण ठरला आहे. या गटास जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा मानदेखील मिळाला आहे. पूर्वी या गटाच्या सदस्या मंगलाबाई जर्मनसिंग वळवी यांच्या रूपाने पहिल्यांना जिल्हा परिषदेचे सभापतीपद मिळाले होते. त्यानंतर गेल्या वेळेस नेतृत्व करणारे सुहास नाईक यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद मिळाले होते. यंदा तर हा गट अधिकच नसीबवान ठरून तालुका पंचायत समितीबरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदेखील मिळाले आहे. कारण गटाचे नेतृत्व करणाºया तरूण सुशीक्षित सदस्या अ‍ॅड.सीमा पद्माकर वळवी या अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. पंचायत समितीच्या नूतन पदाधिकारी पदीही याच गटातील दोघ गणांमधील सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. सभापती यशवंत ठाकरे हे अमोणी गणाचे नेतृत्व करतात तर उपसभापती लताबाई अर्जुन वळवी अंमलपाडा गणाचे नेतृत्व करीत असतात. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाºया जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकारी म्हणून अमोनी गटास छप्पर फाडके दान मिळाल्याने निश्चित अमोनीगट चर्चेत आला आहे. तथापि विकासाच्या बाबतीत हा गट कोसो दूर असल्याचे चित्र आहे. कारण प्रश्नही गेल्या वर्षी गाजला होता. आता ग्रामीण विकासाची जिल्हा परिषदेत नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने विकासाबाबत येथील जनतेच्या भुवया उंचावल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून गेल्या २० वर्षाच्या कालावधीत प्रथमच तापी पलिकडील भागाला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. कारण आजतागायत नंदुरबार व नवापूर या दोन तालुक्यांनाच आलटून पालटून नेतृत्वाची संधी मिळाली होती. या वेळेस तळोद्यासह अक्कलकुवा व धडगाव तालुक्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान मिळावा, अशी मागणी जोर धरत होती. तसा आग्रह सदस्यांचादेखील होता. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना ही सदस्यांची ही मागणी मान्य करायला भाग पडली. साहजिकच माजीमंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी यांची कन्या अ‍ॅड.सीमा वळवी यांचे नाव पुढे येवून त्यांची जिल्हा परिषदेच्या अधञयक्षपदी वर्णी लागली. जिल्हा परिषदेची सत्ता तरूण नेतृत्वाच्या हाती सोपविण्यात आली आहे. त्यामुळे निश्चितच तरूणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याशिवाय अध्यक्षपद तळोदा, धडगाव, अक्कलकुवा सारख्या दुर्गम भागाकडे आल्याने निश्चितच या भागातील विकासाचा मोठा अनुशेष भरुन निवडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.