अंबालाल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST2021-05-03T04:25:00+5:302021-05-03T04:25:00+5:30

भामटू सोनवणे नवापूर : तालुक्यातील खोलघर येथील रहिवासी माजी सरपंच भामटू लालू सोनवणे (६०) यांचे निधन झाले. ते रेशन ...

Ambalal Patil | अंबालाल पाटील

अंबालाल पाटील

भामटू सोनवणे

नवापूर : तालुक्यातील खोलघर येथील रहिवासी माजी सरपंच भामटू लालू सोनवणे (६०) यांचे निधन झाले. ते रेशन दुकानदार राजेश सोनवणे यांचे वडील होत. त्यांच्यापश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी, सून, नातवंड असा परिवार आहे.

हिरालाल जांभळे

शहादा : मनरद, ता.शहादा येथील रहिवासी हिरालाल सखाराम जांभळे (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात भाऊ, सूना, मुलं, नातवंड असा परिवार आहे.

लीलाबाई जांभळे

शहादा : येथील रहिवासी लिलाबाई माधव जांभळे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई, नातवंड असा परिवार आहे.

मोहन जाधव

शहादा : तालुक्यातील धुरखेडा येथील रहिवासी मोहन रघुनाथ जाधव (८४) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात भाऊ, सुना, मुलगा, मुलगी, नातवंड असा परिवार आहे.

नारायण पटेल

बामखेडा : मामाचे मोहिदे हु.मु.शहादा येथील म्युनिसिपल शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नारायण गुलाल पटेल (७३) यांचे निधन झाले. ते जयप्रकाश पटेल यांचे वडील होत. त्यांच्यापश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंड असा परिवार आहे.

शांताबाई चौधरी

बोरद : मोड, ता.तळोदा येथील रहिवासी शांताबाई नामदेव चौधरी (७५) यांचे निधन झाले. त्या लक्ष्मण चौधरी यांच्या आई होत. त्यांच्यापश्चात मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे.

जगन्नाथ पाडवी

खापर : येथील रहिवासी धुळे जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती जगन्नाथ बावा पाडवी (७२) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून, नातवंड असा परिवार आहे.

रमेश भंडारी

खापर : येथील व्यापारी रमेश हस्तिमल भंडारी (६२) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, वहिनी असा परिवार आहे.

मोतीराम पाटील

नंदुरबार : तालुक्यातील शनिमांडळ येथील मोतीराम महादू पाटील (८२) यांचे निधन झाले. ते जीटीपी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे प्रा.एस.यू.पाटील यांचे सासरे होत. त्यांच्यापश्चात तीन मुली, मुलगा, जावई, नातवंड असा परिवार आहे.

Web Title: Ambalal Patil