शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना असला तरी दहावी-बारावीसाठी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST

नंदुरबार : यंदा कोरोनामुळे उशिराने शाळा उघडल्या. ॲानलाइन क्लास व कोरोनाचा पुन्हा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे यंदा दहावी व बारावी ...

नंदुरबार : यंदा कोरोनामुळे उशिराने शाळा उघडल्या. ॲानलाइन क्लास व कोरोनाचा पुन्हा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे यंदा दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थी किती प्रमाणात नोंदणी करतात, याकडे लक्ष होते; परंतु गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधीक असल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात आहे.

यंदा शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा झाला. पहिले शैक्षणिक वर्ष तर घरी बसूनच शिकण्यात गेले. दुसऱ्या सत्रात अर्थात नोव्हेंबर महिन्यात दहावी व बारावीचे वर्ग सुरू झाले असले तरी कोरोनाच्या भीतीने उपस्थितांची संख्यादेखील कमीच राहिली. अशा स्थितीत किती विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ होतात, याकडे लक्ष लागून होते. विद्यार्थी गॅप घेतात किंवा कसे, याबाबतही तर्कवितर्क लावले जात होते.

अशी आहे नोंदणी

n दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणीची प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वीच झाली आहे. कोरोनामुळे परीक्षा होतात का? झाल्याच तर त्या कशा होतील, याची शाश्वती नव्हती. असे असतानाही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने परीक्षेसाठी प्रविष्ठ होण्यात पसंती दिली.

n दहावी परीक्षेसाठी यंदा जवळपास अडीच ते तीन हजार विद्यार्थी वाढले आहेत तर बारावीसाठी साधारणत: ८०० ते हजार विद्यार्थी गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढले आहेत.

n लवकरच आता दोन्ही वर्गांच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहेत. त्यादृष्टीने त्या-त्या शाळांमध्ये तयारीदेखील सुरू झाली आहे. लवकरच बोर्डाकडून रिसीट मिळणार असून, त्यानंतर या परीक्षा होतील.

दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. कोरोना असतानाही विद्यार्थ्यांचे प्रविष्ठ होण्याचे प्रमाण चांगले आहे. शिक्षण विभागाच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली परीक्षेची तयारी सुरू झाली आहे. बहुतेक सर्वच शाळांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला आहे.

-एम.व्ही.कदम,

माध्यमिक शिक्षणाधिकारी.

अभ्यासावर भर

n परीक्षा कुठल्या स्वरूपात होतील, याकडे लक्ष न देता विद्यार्थी आपल्या अभ्यासावर भर देत आहेत. कुठल्या स्वरूपातून परीक्षा झाल्या, तरी त्यासाठी पालक मुलांची तयारी करून घेत आहेत.